शांतताप्रिय जपान होतोय हिंसक !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

शांतताप्रिय जपान होतोय हिंसक !

जपान हा जगातील अतिशय कृतिशील आणि कृतज्ञ लोकांचा देश समजला जातो. जपानचे 'सायोनारा' हे कमरेत वाकून नमस्कार करणारे अभिवादन तर जागतिक पातळीवर नम्रतेचे प्

जानापुरी नजीक राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात पिंपरणवाडी येथील युवक ठार
तापमानवाढीतील बदल
ओबीसींना न्याय

जपान हा जगातील अतिशय कृतिशील आणि कृतज्ञ लोकांचा देश समजला जातो. जपानचे ‘सायोनारा’ हे कमरेत वाकून नमस्कार करणारे अभिवादन तर जागतिक पातळीवर नम्रतेचे प्रतिक बनले आहे. दुसऱ्या महायुध्दाला जन्म देणारा जपान हिरोशिमा – नागासाकीवर अमेरिकेने केलेल्या भिषण हल्ल्यानंतर दुसऱ्या महायुद्धात विनाशर्त शरण आला. तेव्हापासून जागतिक शांततेच्या प्रक्रियेत जपान कायम अग्रेसर राहिला आहे. शांतता आणि  शांततापूर्ण समृध्दी व आर्थिक भरभराट हा जपानचा स्थायीभाव बनला आहे. अशा या जपानमध्ये माजी पंतप्रधान शिंजो ऍबे यांचे निवडणूक प्रचारसभेत भाषण सुरू असताना त्यांच्यावर अवघ्या दहा फुटांच्या अंतरावरून गोळीबार केला गेल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनीही सांगितले. शाॅटगनमधून हा हल्ला झाल्याचेही पोलिस यंत्रणेने सांगितले. हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव तेत्सुया यामागामी असून ४१ वर्षीय ही व्यक्ती जपानसारख्या शांतताप्रिय देशात हिंसाचार करून आपल्याच नेत्याचे रक्त सांडतो, ही बाब फारच भीषण आहे. जग जसजसं भांडवलशाहीच्या दिशेने वाटचाल करीत आहे, तसतसे एक नवा दहशतवाद जन्माला येत आहे, ज्यात भांडवली शक्तींचे हितसंबंध सामावलेले आहेत. ज्याअर्थी अवघ्या दहा फुटांवरून गोळीबार केला जातो आणि त्या गोळ्या झाडणारा व्यक्ती तेथून पळून जात नाही, याचाच अर्थ तो स्वतःला मृत्युचा धोका पत्करून ते भीषण कृत्य करतो, याचा अर्थ तो कोणाच्या सुपारीवरून हा हिंसाचार करित नसेल तर एखाद्या अतिरेकी विचारांनी त्याच्या मनाचा कब्जा घेतलेला दिसतो. कारण खून करणारी व्यक्ती लपून छपून असा गुन्हा करते किंवा गुन्हा करून पळून जाण्याची सर्व योजना तत्पर ठेवते, तेव्हा तशी व्यक्ती ही कोणाची तरी सुपारी घेऊन असा गुन्हा घडवते, हे जगभरातील पोलिसांच्या तपासात आतापर्यंत निष्पन्न झालेले सत्य आहे. शिंजो ऍबे यांचे नेतृत्व हे असे नेतृत्व आहे की, ज्यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर लोकशाही असलेल्या जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले. २००६ मध्ये ते जपानचे पंतप्रधान बनले. परंतु, आतड्याच्या गंभीर आजारामुळे त्यांनी वर्षभरात म्हणजे २००७ ला राजीनामा दिला. त्यानंतर ते २०१२ मध्ये पुन्हा पंतप्रधान झाले. त्यानंतर २०२० मध्ये त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुन्हा राजीनामा दिला. त्यांच्यानंतर आलेल्या अनेक पंतप्रधानांना ६-६ महिन्यांनी वेगवेगळ्या कारणास्तव राजीनामे द्यावे लागले. ऍबे यांनी जपानच्या एकूणच अर्थव्यस्थेला उजवे वळण दिले. राष्ट्रवाद या नावाखाली त्यांनी जपानच्या खाजगीकरणाच्या व्यवस्थेला चालना दिली. संरक्षण विभागावर दुसऱ्या महायुद्धानंतर खर्च वाढवणारे ते जपानचे एकमेव पंतप्रधान ठरले. परंतु, त्यांच्या आर्थिक पुनर्रचनेत सर्वाधिक वादग्रस्त ठरणारा निर्णय म्हणजे त्यांनी लावलेला उपभोक्ता कर. सर्वसामान्य जनतेवर कराचे ओझे लादणारा उपभोक्ता कराचा निर्णय घेताना त्यांनी ८ टक्क्यांपेक्षा अधिक कर लावून जपानच्या सर्व सामाजिक कल्याणकारी योजनांच्या खर्चालाही कात्री लावली. सोवियत युनियन असणाऱ्या रशियाचा पाडाव झाल्यानंतर जगभरात भांडवलशाही च्या कलाने जाणारे, ज्यांना उजव्या विचारसरणीचे म्हणून ओळखले जाते, असे सत्ताधारी जगभरातील अनेक देशांमध्ये लाभले, त्यातील ऍबे हे देखील एक आहेत. तुटीचा अर्थसंकल्प हे राष्ट्राचे विकृत स्वरूप असते, असे मानणारे ऍबे यांनी सामाजिक योजना बंद करून आणि उपभोक्ता कर वाढवून अर्थसंकल्पातील तुट खूपच कमी केली. जी केवळ एक टक्का एवढीच राहीली होती. परंतु, याचा दुसरा अविभाज्य परिणाम जपानचे येन हे चलन डाॅलर च्या तुलनेत खूपच खाली आले. त्यांच्या काळात ७७ ते १०१ येन एवढी एका डाॅलरची किंमत झाली होती. अशा प्रकारचे धाडसी निर्णय घेणारे नेतृत्व सर्वच बाबतीत निर्भिड असते. प्रसन्न व्यक्तीमत्व असणारे ऍबे यांनी जपानला नव्या अर्थव्यवस्थेशी जोडले. जपानच्या रिझर्व बॅंकेच्या धोरणांमध्ये देखील त्यांनी मोठ्याप्रमाणात बदल घडवले. हे सर्व निर्णय घेत असताना त्यांनी आपल्या एलडीपी या पक्षाची जंमानसावर पकड बसवली. अशा ऍबे यांचा खून हा जागतिक पातळीवर एक मोठा धक्का आहे.

COMMENTS