Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इन्कम टॅक्स भरणे, म्हणजे एक प्रकारची देश सेवाच

सीए डॉ. गिरीश आहुजा यांचे प्रतिपादन

कोपरगाव शहर प्रतिनिधी : इन्कम टॅक्स हा प्रत्येक व्यवसायातील व्यक्तीला भरावा लागतो. इन्कम टॅक्स विषयी असणारा कायदा हा टॅक्स भरणार्‍या प्रत्येक व्य

257 गावांमध्ये जलसंधारणाची कामे गतीने करा ः जिल्हाधिकारी सालीमठ
ग्रामपंचायतींच्या रिक्त पावणेतीनशे जागांचा वाजला बिगुल…
बाफना पॉलिमर्सने नेले जामखेडचे नाव जागतिक पातळीवर

कोपरगाव शहर प्रतिनिधी : इन्कम टॅक्स हा प्रत्येक व्यवसायातील व्यक्तीला भरावा लागतो. इन्कम टॅक्स विषयी असणारा कायदा हा टॅक्स भरणार्‍या प्रत्येक व्यक्तीची सत्यता पडताळून पाहत असतो. सध्या डिजिटल युग असल्यामुळे व्यवसाय करणार्‍या प्रत्येक व्यक्तीने वास्तविक परिस्थितीचे भान ठेवून योग्य तो नफा तोटा नोंदविला पाहिजे. चुकीच्या पद्धतीने नफा तोटा नोंदविला गेला तर नुकसान आपलेच आहे. चुकीच्या कामामुळे कारवाई होत असते. त्यामुळे स्वतःमध्ये वेळेनुसार बदल केला पाहिजे. इन्कम टॅक्स भरणे म्हणजे देश सेवा करणे आहे. त्यामुळे प्रत्येकाने इन्कम टॅक्स वेळेवर भरावा. असे आवाहन सुप्रसिद्ध व्याख्याते सीए डॉ.गिरीश आहुजा यांनी केले.

समता चॅरिटेबल ट्रस्ट आणि सोनतारा भनसाळी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव शहरात प्रथमच ’इन्कम टॅक्स कायदा व बजेट 2024’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र 7 ऑगस्ट 2024 रोजी कृष्णाई बॅन्केट हॉल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चर्चासत्राची सुरुवात व्याख्याते सीए डॉ.गिरीश आहुजा, समता चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, सोनतारा भनसाळी ट्रस्ट अध्यक्ष अरविंद भनसाळी, उपाध्यक्ष संजय भनसाळी, व्याख्यानमाला संयोजक राजकुमार बंब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रमुख व्याख्याते डॉ.गिरीश आहुजा व मान्यवरांचे स्वागत राजकुमार बंब यांनी केले तर परिचय सीए प्रसाद भंडारी यांनी करून दिला. या प्रसंगी डॉ.गिरीश आहुजा यांनी इन्कम टॅक्स कायदा व 2024 च्या बजेट विषयी सर्व सामान्यांना समजेल अशा साध्या, सोप्या व ओघवत्या भाषेत सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थितांच्या शंकांचे ही समाधान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी केले. या एक दिवसीय चर्चासत्राला कोपरगाव तालुक्यातील चार्टर्ड अकाउंटंट, टॅक्स प्रॅक्टिशनर, व्यापारी इंडस्ट्रियलिस्ट, बँकिंग क्षेत्र, मेडिकल असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन या विविध विविध क्षेत्रातील व्यक्ती सहभागी झाले होते. अजिंक्य भनसाळी यांनी मानले.

गेल्या 7 वर्षापासून समता चॅरिटेबल ट्रस्ट आणि सोनतारा भनसाळी ट्रस्ट सामाजिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विविध विषयांवर व्याख्याने, मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित करत असतो. या व्याख्यानमालेच्या अनुषंगाने कोपरगावकरांना एक सकारात्मक विचारांची मेजवानी देण्याचा मानस आहे. सीए डॉ.गिरीश आहुजा यांचे व्याख्यान हे व्याख्यानमालेचे 8 वे पुष्प असून इन्कम टॅक्स कायदा व 2024 चे आर्थिक बजेट विषयी कोपरगावकरांना सविस्तर माहिती मिळेल. काका कोयटे, अध्यक्ष समता चारिटेबल ट्रस्ट

COMMENTS