Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरातून पे अँड पार्कचे बोर्ड जातात चोरीला

अहिल्यानगर : महानगरपालिकेने शहरात पे अँड पार्क सुरू केले असून त्याचे काम दिग्वजय एंटरप्राईजेला दिलेले आहे,या फर्मने  शहरातील  बुरुडगाव रोड,भिस्तब

मालवाहू ट्रक आणि ऑटोची समोरासमोर धडक चार जणांचा जागेवरच मृत्यू
देशात होणार जातीनिहाय जनगणना ; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
सुवर्णनगरीत ईडीकडून छापेमारी

अहिल्यानगर : महानगरपालिकेने शहरात पे अँड पार्क सुरू केले असून त्याचे काम दिग्वजय एंटरप्राईजेला दिलेले आहे,या फर्मने  शहरातील  बुरुडगाव रोड,भिस्तबाग, प्रोफेसर कॉलनी, मॅक्स केअर हॉस्पिटल आदी ठिकाणी महानगरपालिकेचे पे अँड  पार्कचे बोर्ड लावलेले आहे,हे बोर्ड लावल्यानंतर जानेवारी व  फेब्रुवारी महिन्या मध्ये 15 बोर्ड चोरीला गेलेले आहेत. 

    काल संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी मॅक्स केअर हॉस्पिटल जवळ  एक जण हे बोर्ड सकाळी चोरताना पकडला गेला.त्यांनी माफी मागितल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नाही.परंतु हे बोर्ड   महानगरपालिकेची मालमत्ता असून यापुढे असे बोर्ड चोरीला जाणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने व महानगरपालिकेने लक्ष द्यावे व सहकार्य करावे अशी विनंती संबंधित फर्मने केली आहे

COMMENTS