24 वर्षांपासूनच्या थकीत बड्या 273 जणांवर पवारांची कृपा…भूविकास बँकेचे पावणे बारा कोटीचे कर्ज झाले माफ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

24 वर्षांपासूनच्या थकीत बड्या 273 जणांवर पवारांची कृपा…भूविकास बँकेचे पावणे बारा कोटीचे कर्ज झाले माफ

अहमदनगर/प्रतिनिधी ः मागील 24 वर्षांपासून थकबाकीत असलेल्या जिल्ह्यातील बड्या 273 कर्जदारांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शुक्रवारी कृपा झाली. या मंड

कुटुंब जिव्हाळा आणि शैक्षणिक कळवळा हेच शिक्षकांचे तपोधन ः प्राचार्य अनारसे
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून कोपरगांव तालुक्यातील रस्त्यांचा विकास करणार पालकमंत्री मुश्रीफ
एकलहरे शिवारात धाडसी दरोडा ; एकाचा खून

अहमदनगर/प्रतिनिधी ः मागील 24 वर्षांपासून थकबाकीत असलेल्या जिल्ह्यातील बड्या 273 कर्जदारांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शुक्रवारी कृपा झाली. या मंडळींनी भूविकास बँकेकडून घेतलेले 11 कोटी 76 लाख 72 हजाराचे थकीत कर्ज पवारांनी माफ केले. राज्याचे अंदाजपत्रक विधानसभेत सादर करताना पवारांनी अर्थातच राज्यभरातील भूविकास बँकांची कर्जमाफी जाहीर केली. यात नगर जिल्ह्याच्या थकबाकीदारांनाही लाभ मिळाला आहे.

1998मध्ये या कर्जदारांनी कर्ज घेतले होते. कोणी ट्रॅक्टरसाठी घेतले तर कोणी अन्य कृषी साहित्य वा शेतीपिकासाठी. कर्ज घेतल्यावर रुपयाची परतफेड केली गेली नाही. मात्र, अशा जिल्ह्यातील 292 थकबाकीदारांवर उपमुख्यमंत्री पवार यांनी कर्जमाफीच्या रुपाने कृपा करण्याचे ठरवले होते व तसे मागच्या ऑगस्ट 2021मध्ये जाहीरही केले होते. राज्यभरातील भूविकास बँकेच्या सर्वच थकबाकीदारांना कर्जमाफी देण्याचे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केल्याने त्यांच्या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रतीक्षा होती. या घोषणेतून जिल्ह्यातील बडी राजकीय व सामाजिक धेंडे असलेल्या 292 जणांनाही 11 कोटी 11 लाखाची माफी मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतर काहींनी त्यांच्याकडील थकीत पैसे भरल्याने आता थकबाकीत 273जण राहिले आहेत व त्यांचे दंड-व्याज वाढल्याने माफीची रक्कम 11 कोटी 76 लाख 72 हजार रुपये झाली आहे. शिवाय आता विधानसभेत या माफीची घोषणा झाल्याने तिची अंमलबजावणीही लवकरच अपेक्षित आहे.

1965-66 मध्ये जमिनीच्या 7/12वर शेतकर्‍यांना कर्ज देण्यासाठी स्थापन झालेली भू-विकास बँक बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या बरोबरच भू-विकास बँकेची राज्यभरातील 34 हजार 788 शेतकर्‍यांकडे असलेली थकित कर्जाची सुमारे 964 कोटीची रक्कम सरकारने माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात 273 थकीत कर्जदारांकडे थकबाकीपैकी 2 कोटी 93 लाख 35 हजार रुपयांची मुद्दल रक्कम येणे असून, त्यावर व्याज 1 कोटी 29 लाख 12 हजार व इतर व्याज रक्कम 7 कोटी 54 लाख 25 हजार रुपये आहे. ही तिन्ही मिळून एकूण रक्कम 11 कोटी 76 लाख 72 हजार रुपये होते.

COMMENTS