Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पवार विरुद्ध पवार संघर्ष शिगेला

अजित पवार गटाचे सुप्रिया सुळेंना थेट आव्हान

मुंबई ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता अजित पवार गट अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. कारण अजित पवार गटाचे चिंतन शिबीर कर

महापालिकेतील ‘प्रशासकराज’ कारवाईचा बडगा उगारणार का ?
नक्षलवाद्यांविरोधातील ऑपरेशन का झाले अपयशी?
ऐफाज व तैमुर ने धरले रमजानचा उपवास

मुंबई ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता अजित पवार गट अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. कारण अजित पवार गटाचे चिंतन शिबीर कर्जतमध्ये पार पडत असून, या शिबिरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेच्या चार जागा लढवण्याची घोषणा केली असून, यामध्य बारामतीच्या जागेचा समावेश असल्यामुळे आता अजित पवार गटाने थेट खासदार सुप्रिया सुळे यांनाच आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्धार मेळावा कर्जतमध्ये सुरू आहे. या दोन दिवसीय शिबिरातून पक्षाची पुढील, वाटचाल, ध्येयधोरणे ठरवतानाच आगामी काळात पवार विरुद्ध पवार सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांचे सरकार असून हे एकत्र निवडणूक लढणार का स्वतंत्र हे ठरले नसतांना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कर्जत येथील चिंतन शिबिरात अजित पवार यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. अजित पवार यांनी लोकसभेच्या चार जागा या राष्ट्रवादी कॉँग्रेस लढवणार असल्याचे भर सभेत जाहीर केले आहे. तसेच मार्चमध्ये लोकसभा आचार संहिता लागणार असल्याचे देखील तयारीला लागा असे पवार म्हणाले. अजित पवार यांनी ठाकरे गटाच्या जागांवरही दावा केला आहे. यामुळे मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचे टेंशन वाढले असून ते काय भूमिका घेतात हे महत्वाचे ठरणार आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. कर्जत येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे चिंतन शिबिर सुरू आहे. या शिबरात बोलतांना अजित पवार यांनी मार्च 2024 च्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक जाहीर होतील, असा अंदाज व्यक्त करत सातारा, शिरुर, रायगड आणि बारामती या लोकसभेच्या जागा लढवणार असल्याचे घोषित केले. अजित पवार म्हणाले, आपल्याकडे असणार्‍या बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या चार जागा आपण लढवणार आहोत. या सोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे ज्या जागा आहेत, त्या ठिकाणी देखील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष ताकद लावणार आहे. या संदर्भात भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला जागा वाटप करता येईल. जागावाटपाबाबत आम्ही सर्व मिळून चर्चा करुन ठरवू. जागा बाबत भाजप नेते अमित शाह, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील. या संदर्भात आमची प्राथमिक चर्चा झाली. सध्या, पाच राज्यांच्या निवडणुका सुरू असून या झाल्यावर बसून जागा वाटपाबाबत बोलायचे असे आमचे ठरले असल्याचे पवार म्हणाले. जागा वाटप करतांना लेक्टिव्ह मेरिट पहिले जाईल. कार्यकर्त्यांची ताकद ही एनडीएच्या मागे लावू, असे देखील पवार म्हणाले.

निर्णय आवडला नाही तर बोलावले कशाला?- अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्यावेळचा प्रसंग सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला. देवगिरीवर भाजपसोबत जाण्याबाबत थेट साहेबांना सांगितले तर काय होईल. या विचाराने मी ताईंना बोलवले आणि सांगितले. ताईंनी वेळ मागितला आणि आम्ही देखील थांबलो. त्यानंतर मला घरी बोलवल, आणि अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. असे शरद पवार साहेबांनी सांगितले. आम्हाला घरातल्या 4 लोकांना हे माहित होते, असे अजित पवार म्हणाले. त्यानंतर आम्ही 2 जुलै ला शपथ घेतली.. असा खुलासा अजित पवार यांनी केला. तसेच 2 जुलैला घेतलेला निर्णय आवडला नाही तर 15 जुलैला बोलवले कशाला? आधी मंत्री या मग आमदार या असे सांगितले. निर्णय आवडला नाही तर बोलावले कशाला? मी फसवणूक म्हणणार नाही, पण गाफील का ठेवता? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

COMMENTS