पुणे ः पावसामुळे पवना धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ होत असून त्यातून मुळा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीतील पाणी पातळीची वाढ लक्षा
पुणे ः पावसामुळे पवना धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ होत असून त्यातून मुळा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीतील पाणी पातळीची वाढ लक्षात घेता अशा परिस्थितीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना घेण्यात येत असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. पवना धरण सध्या 89.82 टक्के भरले आहे. तर मुळशी धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा नियंत्रित विसर्ग सोडला जाण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला मिळाल्या आहेत. या सर्व बाबी विचारात घेता प्रशासनाला सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत.
COMMENTS