Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथरवट समाज सेवा मंडळाने केला गुणवंतांचा सन्मान

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुका पाथरवट समाज्याच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन

*मोठी बातमी : दौंड शहरात शिव जनसेवा कोविड केअर सेंटर चा उदघाटन सोहळा संपन्न… | Lok News24*
भावाला वाचवायला गेलेल्या बहिणीचा मात्र मृत्यू
कोळपेवाडी महेश्‍वर यात्रा महोत्सव जल्लोषात

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुका पाथरवट समाज्याच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला. वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवून वेगळी ओळख निर्माण केलेल्या कोपरगाव तालुका पाथरवट समाजाने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करत त्यांना लढण्यासाठी बळ दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जगन्नाथ धुमाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून उपायुक्त विशाल शेरे, नितीन गगे, डॉ. कौस्तुभ भोईर, सिन्नर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष संतोष भोपी, प्रा. बाळासाहेब डोंगरे, अनिल टोरपे, माधवराव वाघ यांची उपस्थिती लाभली. सुनिल भगत, काशिनाथ डोंगरे, बाळकृष्ण टोरपे, सुनिल गगे, विलास गगे, प्रसाद धुमाळ, गौरव आमले, रमेश गगे, चंद्रकांत केणे, अशोक भगत,  दिपक धुमाळ, ऋषिकेश धुमाळ,गौरव केणे, विकी टोरपे, सुनिल टोरपे, युवराज शेरे, मच्छिंद्र खारके, सुनिल गगे आदींसह समाज बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक नंदकिशोर टोरपे यांनी केले तर सूत्रसंचालन अ‍ॅड. स्वाती मैले यांनी व आभार संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिकेत गगे यांनी मानले.

COMMENTS