Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी २४ तासात लावला गुन्ह्याचा छडा

पाथर्डी प्रतिनिधी - बुधवार (२४) जानेवारी रोजी शहरातून मालवाहतूक वाहनामधून ४ लाख ४३ हजार ३९० रोख रक्कम चोरी गेलेल्या गुन्ह्याचा पाथर्डी पोलिस आ

संघर्षातुन माझ्या राजकीय जीवनाची सुरु
धार्मिक स्थळांना उत्पन्न नसल्याने कर सवलत क्रमप्राप्त – बाळासाहेब बोराटे
सात वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा लावला शोध… | DAINIK LOKMNTHAN

पाथर्डी प्रतिनिधी – बुधवार (२४) जानेवारी रोजी शहरातून मालवाहतूक वाहनामधून ४ लाख ४३ हजार ३९० रोख रक्कम चोरी गेलेल्या गुन्ह्याचा पाथर्डी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांच्या संयुक्त पथकाने २४ तासात छडा लावत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया केली आहे.या गुन्ह्याचा तपास जलद गतीने करणाऱ्या पथकाचे कौतूक पाथर्डीकर करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,२४ जानेवारी (बुधवार) रोजी नेहमीप्रमाणे आधुनिक कुरीयर नवी पेठ अ.नगर येथून मालवाहतूक गाडीचा चालक बाबासाहेब शिवाजी पवार पाथर्डी येथे आल्यानंतर त्याला  मिळालेली ४ लाख ४३ हजार ३९० रक्कम चोरीला गेली होती.

त्यानंतर चालक पवार याने पाथर्डी पोलिस ठाणे गाठत पोलिसांना यासंबंधी माहिती दिली असता पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर,पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल आव्हाड,पोलीस नाईक राम सोनवणे, लक्ष्मण पोटे,महिला पोलीस मनिषा धाने यांनी धाव घेत शहरातील चार ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यामध्ये त्यांना दोन इसम संशयीत आढळून आले त्याप्रमाणे त्यांनी वरिष्ठांकडे माहिती सुपूर्द केली.त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने पुढील तपास करत दोन जणांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया पाथर्डी पोलीस करत आहेत.

COMMENTS