पाथर्डी शहरातील  सोन्याचांदीचे व्यापारी राजेंद्र उर्फ बंडूशेठ चिंतामणी यांच्यावर खुनी हल्लाच्या निषेधार्थ उद्या शुक्रवारी पाथर्डी बंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी शहरातील  सोन्याचांदीचे व्यापारी राजेंद्र उर्फ बंडूशेठ चिंतामणी यांच्यावर खुनी हल्लाच्या निषेधार्थ उद्या शुक्रवारी पाथर्डी बंद

पाथर्डी प्रतिनिधी- शहरातील नवी पेठेतील सोन्या चांदीचे व्यापारी बंडूशेठ उर्फ राजेंद्र चिंतामणी हे नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून आनंदनगर ये

विद्यानिकेतन अ‍ॅकेडमीत विद्यार्थी परिषदेची निवडणूक उत्साहात
संगमनेरला तात्काळ दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करा
डॉ. बाबुराव उपाध्ये यांची पुस्तके भक्ती व नीतीचे संस्कार देतात : मीराताई बागूल

पाथर्डी प्रतिनिधी- शहरातील नवी पेठेतील सोन्या चांदीचे व्यापारी बंडूशेठ उर्फ राजेंद्र चिंतामणी हे नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून आनंदनगर येथे घरी जात असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर शेवगाव रोडवर खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.या हल्लात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.त्यांच्यावर पाथर्डी उपजिल्हारुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या गाडीने अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड.प्रताप ढाकणे,लालकृष्ण अडवाणी पतसंस्थेचे चेअरमन अमोल गर्जे,स्वामी समर्थ पतसंस्थेचे संचालक बंडूशेठ भांडकर,मुकुंद गर्जे,मनसेचे संतोष जिरेसाळ,बंडूशेठ बोरुडे,काँग्रेसचे नासिर शेख,किशोर परदेशी

विविध पक्षांच्या पदाधिकारी तसेच सराफ संघटनेचे राजेंद्र शेवाळे,बाळासाहेब जिरेसाळ,सुनील भांगे,संजय दराडे,सुनील मानूरकर,मोदक शहाणे,मधुकर मानूरकर,बाळासाहेब जोजारे यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देत झालेल्या घटनेवर चिंता व्यक्त करत प्रशासनावर नाराजी व्यक्त करत,या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्याच्या आणि  सर्वपक्षाच्या वतीने बंद पाळण्यात येणार असून शहरातील नागरिकांना नावीपेठ येथील गणपती मंदिर येथे सकाळी १० वाजता येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS