Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तीन प्राध्यापकांना पेटंट तर सेट परिक्षेत सात जणांचे यश

लोणी ः लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील तीन प्राध्यापकां

Ram Kadam | 12 आमदारांचे निलंबन ही संविधानाची पायमल्ली |LOKNews24
शिक्षक बँक सत्ताधार्‍यांनी 24 कोटींचा हिशेब लपवला ; गुरुमाऊलीच्या एका गटाचा आरोप
शकुर पैलवान चुडीवाला स्मृतीप्रित्यर्थ किरण काळे यांच्याकडे मानाची गदा सुपूर्द

लोणी ः लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील तीन प्राध्यापकांना संशोधनासाठी पेटंट तर सात प्राध्यापकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून सेट परीक्षेत यश संपादन केले आहे.अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली.
     संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासोबतच प्राध्यापकांनाही संशोधन आणि पुढील शिक्षणासाठी प्रेरणा देण्याचं काम संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील हे करत आहेत आणि याच माध्यमातून पद्मश्री विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील डॉ. कल्पना वामनराव पलघडमल, डॉ. वैशाली दत्तात्रय मुरादे आणि प्रा. संतोष दत्ताञय गुजर यांना  संशोधनासाठी पेटंट तर याच महाविद्यालयातील प्रा. स्वप्निल दामोदर गोपाळे, प्रा. राहुल मारुती आहेर,प्रा. श्‍वेता बाबासाहेब दिघे,प्रा. शोभा अशोक मुसमाडे,प्रा. हर्षदा साहेबराव वाकचौरे प्रा. शितल बबनराव भालके  आणि प्रा. दिपाली दत्तात्रय सूर्यवंशी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या सेट परीक्षेत यश प्राप्त केले. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पासून संस्थेमध्ये शिक्षणाबरोबरच प्राध्यापकांना संशोधन करता यावे यासाठी प्रोत्साहन दिले जाते आणि याच माध्यमातून आजपर्यंत या महाविद्यालयातील 22 प्राध्यापकांनी विविध विषयावरती  पेटंट मिळवले आहे. यशस्वी प्राध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, कॅम्पस संचालक डॉ. आर. ए. पवार, डॉ. महेश खर्डे आदींनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS