Homeताज्या बातम्यादेश

पतंजलीची सोन पापडी गुणवत्तेत नापास

कंपनीच्या व्यवस्थापकासह तिघांना कारावास

नवी दिल्ली ः योगगुरू बाबा रामदेव यांनी आपल्या उत्पादनाबाबत वर्तमानपत्रात केलेले दावे तथ्यहीन असल्याप्रकरणी अणि फसव्या जाहीरातीप्रकरणी कोर्टात याच

देशाला समजून घेताना..!
फडणवीसांची माफी म्हणजेच कबुलीनामा ः शरद पवार
लोकसभा अध्यक्ष निवड आणि सद्यस्थिती !

नवी दिल्ली ः योगगुरू बाबा रामदेव यांनी आपल्या उत्पादनाबाबत वर्तमानपत्रात केलेले दावे तथ्यहीन असल्याप्रकरणी अणि फसव्या जाहीरातीप्रकरणी कोर्टात याचिका सुरू असून, याप्रकरणी बाबा रामदेव यांनी अनेकवेळेस न्यायालयात माफीनामा सादर केल्यानंतर पंतजलींच्या अडचणी कमी होतांना दिसून येत नाही. कारण पंतजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत नापास ठरली आहे. याप्रकरणी उत्तराखंडमधील पिथोरागडच्या न्यायदंडाधिकार्‍यांनी पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीच्या सहाय्यक व्यवस्थापकासह तीन जणांवर कारवाई केली आहे. तिघांनाही सहा महिन्यांचा कारावास आणि दंड अशा स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी, 17 ऑक्टोबर 2019 रोजी अन्न सुरक्षा निरीक्षकांनी पिथोरागडच्या बेरीनागमधील मुख्य बाजारपेठेतील लीलाधर पाठक यांच्या दुकानाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी या दुकानातील काही खाद्यपदार्थांची तपासणी केली. या तपासणीनंतर त्यांनी दुकानातील ‘पतंजली नवरत्न इलायची सोनपापडी’बाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर दुकानातील सोनपापडीचे काही नमुने त्यांनी गोळा केले. यासह रामनगर येथील ‘कान्हा जी’ या वितरकाला (पतंजली सोनपापडीचे वितरक) आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांना नोटीस बजावली होती. अन्न सुरक्षा निरीक्षकांनी बेरीनागपाठोपाठ रुद्रपूर, उधम सिंह नगर आणि उत्तराखंडमधील काही दुकानांमधील पतंजली सोनपापडीचे नमुने गोळा केले. अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांमध्ये या सोनपापडीची तपासणी करण्यात आली. या प्रयोगशाळांनी डिसेंबर 2020 मध्ये राज्याच्या अन्न सुरक्षा विभागाला पतंजलीच्या सोनपापडीची निकृष्ट गुणवत्ता दर्शवणारा अहवाल पाठवला. त्यानंतर व्यावसायिक लीलाधर पाठक, विरतक अजय जोशी आणि पतंजलीचे सहाय्यक व्यवस्थापक अभिषेक कुमार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी न्यायालयाने तिघांना सहा महिन्याच्या कारवासाची शिक्षा सुनावली आहे.

COMMENTS