Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पार्वताबाई बाबुराव आरोटे यांचे निधन

अकोले ः तालुक्यातील चितळवेढे येथील जुन्या पिढीतील वारकरी संप्रदाय परिवारातील व्यक्तिमत्व गं. भा पार्वताबाई बाबुराव आरोटे यांचे वयाच्या 105 व्या व

शुटींगबाँल स्पर्धेत मुलींच्या गटातुन अमरावतीने, मुलांमध्ये नाशिक विभागाने मैदान मारले
एक लाख रुपये न दिल्यास अश्‍लिल फोटो व्हायरल करेल
कृषिकन्याचे पानसवाडीत शेती मार्गदर्शन

अकोले ः तालुक्यातील चितळवेढे येथील जुन्या पिढीतील वारकरी संप्रदाय परिवारातील व्यक्तिमत्व गं. भा पार्वताबाई बाबुराव आरोटे यांचे वयाच्या 105 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्या चितळवेढे गावचे माजी उपसरपंच आनंदराव आरोटे, रघुनाथ आरोटे, निवृत्ती आरोटे यांच्या मातोश्री व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई चे राज्य सरचिटणीस डॉ. विश्‍वासराव आरोटे यांच्या आजी होत्या. चितळवेढे सोसायटीच्या संचालिका परिघा आरोटे यांच्या आजेसासू होत्या. त्यांचे पश्‍चात तीन मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. चितळवेढे ता. अकोले येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

COMMENTS