संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरु होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता यंदा दोन टप्प्यात अधिवेशन होणार आहे. त्यानुसार

आठवडे बाजारातील दुकानदार व ग्राहकांना मोफत पाण्याची सोय ः काका कोयटे
अकरावीच्या सीईटीसाठी 19 जुलैपासून नोंदणी सुरू
भारतीय विद्यार्थ्याला अमेरिकेत जीममध्ये भोसकले

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरु होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता यंदा दोन टप्प्यात अधिवेशन होणार आहे. त्यानुसार 31 जानेवारी ते 8 एप्रिल दरम्यान दोन टप्प्यात हे अधिवेशन होणार आहे. देशात फेब्रुवारीमध्ये होणार्‍या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार काय घोषणा करणार याकडे लक्ष लागून राहणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत असणार आहे. तर दुसरा भाग 14 मार्च ते 8 एप्रिल या काळात असेल. संसदेत 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सितारमन अंर्थसंकल्प मांडतील. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व्यवस्थित आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कऱण्यास सांगितलं आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे अर्थंसंकल्पीय अधिवेशनावर टांगती तलवार होती. काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काही दिवसांपूर्वीच संसद भवनाची पाहणी करून आढावा घेतला होता. संसद भवनातील अनेक कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे.

दोन टप्प्यात चालणार अधिवेशन
नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत अधिवेशन चालणार आहे. तर दुसरा टप्पा 14 मार्च ते 8 एप्रिल पर्यंतचा असणार आहे. याशिवाय 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

COMMENTS