Homeताज्या बातम्यासंपादकीय

संसद लोकांचे प्रतिबिंब

भारतीय संसद जी एका शतकापेक्षाही अधिक काळातील घटनांची साक्षीदार राहिली आहे, त्या इमारतीतून संसद आता नव्या इमारतीमध्ये स्थलांतरित होणार आहे. तर दुस

संविधानाचे यश आणि अपयश
काँगे्रस गळती रोखणार कशी ?
कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा

भारतीय संसद जी एका शतकापेक्षाही अधिक काळातील घटनांची साक्षीदार राहिली आहे, त्या इमारतीतून संसद आता नव्या इमारतीमध्ये स्थलांतरित होणार आहे. तर दुसरीकडे जुनी संसद भवन संविधान भवन म्हणून ओळखली जाणार आहे. 1919 च्या मोर्ले मिटों कायद्यानंतर याच इमारतीमध्ये केंद्रीय विधिमंडळाचे अधिवशेन भरले होते. याच अधिवेशनामध्ये भगतसिंग आणि बुटकेश्‍वर दत्त यांनी बॉम्बस्फोट घडवून ब्रिटीश सरकारपर्यंत भारतीयांचा आवाज पोहचवण्याचा प्रयत्न केला होता. तर याच सभागृहामध्ये पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून विठ्ठलभाई पटेल यांनी भूमिका निभावली होती. तर दुसरीकडे भारताचे प्रथम हंगामी सरकार आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेवून याच सभागृहातून संविधान सभेचे आणि लोकसभेचे कामकाज सुरू होत होते. संविधान सभेने खर्‍या अर्थाने देशाची पुढील वाटचाल काय आणि कशी असेल, याला दिशा दिली. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आगामी काही शतकांचा वेध घेवून, स्वतंत्र भारत कसा असेल, भारतासमोर आगामी काळामध्ये कोणते संकट असेल, या सर्व बाबींचा बोध घेवून सर्वसमावेशक, सर्व घटकांना न्याय देणारे संविधान देण्याचा प्रयत्न केला. देशासाठी डॉ. आंबेडकरांनी केवळ संविधानच दिले नाही तर, सर्वसमावेशक पाणी धोरण, ऊर्जा धोरण देण्याचा प्रयत्न केला. भाक्रा नागनल धरणाची योजना बाबासाहेबांनी सर्वप्रथम मांडली होती. त्याचबरोबर संविधान सभेमध्ये अनेक विषयांवर खडाजंगी चर्चा होवून संविधान अस्तित्वात आले. आज बरेचजण भारतीय लोकशाही धोक्यात असल्याची बोंबाबोंब करतांना दिसून येत आहे. मात्र लोकशाहीची ही संक्रमणावस्था आहे. लोकशाही जशी लोकांसाठी आहे, तशीच ती तिच्या विरोधकांसाठी देखील आहे. त्यामुळे लोकशाहीचा किस पाडतांना, तिच्यावर अनेक संकटे आली. मात्र तरीदेखील भारतीय संविधान तावून-सुलाखून बाहेर पडली. 1975 मध्ये आणीबाणीचे गडद काळेकुट्ट ढग तिच्यावर बरसत होते. तरीदेखील लोकशाही ठाम अविचलपणे उभी होती. आणि तिने या आणीबाणीला परतावून लावले. आणि पुन्हा एकदा लोकशाहीवर स्वार झाली. त्यामुळे भारतीय संसद ही लोकशाहीचे प्रतिबिंब असून, तिच्या जडण-घडणीतूनच भारतीय लोकशाही सावरतांना दिसून येत आहे. आणि या 75 वर्षांमध्ये भारतीय संविधान आणि भारतीय लोकशाही तावून सुलाखून निघाली असून, ती यशस्वी होतांना दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय संसद या सर्व घटनांची मूक साक्षीदार आहे. अनेक ऐतिहासिक घटना तिने आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे सक्षम असा भारत देश घडतांना दिसून येत आहे. भारतीय संविधान अंमलात आल्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पंडित नेहरू पुन्हा एकदा प्रजासत्ताक भारताचे पंतप्रधान म्हणून विराजमान झाले. त्यांनी आपल्या कार्यकाळात कृषी, औद्योगिक, पायाभूत सोयी-सुविधा उभारण्यावर मोठा भर देण्याचा प्रयत्न केला. यातूनच भारत आज सक्षमपणे उभा आहे. नुकतीच राजधानी दिल्लीमध्ये जी-20 देशांची परिषद भरली होती. या परिषदेमध्ये भारताचे सार्वभौम आणि सर्वसमावेशक रूप दिसून आले. आपली वाटचाल ही विकासाच्या अजेंड्यावर सुरू असून, मानवी आयुष्य अधिक सुखकर कसे करता येईल, यादृष्टीने प्रयत्न करणे सुरू आहे. त्यामुळे इतर मुद्दयावर भारताला भारताची ताकद खर्ची घालायची नाही, असा संदेशच भारताने दिला आहे. त्यामुळे भारताच्या या धोरणांवर अमेरिकासारखा देश देखील खुश होतांना दिसून येत आहे. 

COMMENTS