Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परिनिर्वाण चित्रपट इतिहास घडवणार – सुनील शेळके

मातृतीर्थ नगरीत माध्यमांसोबत साधला संवाद

सिंदखेड राजा : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक हजार वर्षांचा इतिहास मोडून काढीत नवा इतिहास घडवला. त्याचदरम्यान बाबासाहेबांचा इति

निसर्गाचा प्रकोपापेक्षा व्यसनमुक्तरहाणे आपल्या हातात : हभप बंडातात्या कर्‍हाडकर
राहुरीत ठेकेदाराच्या घरी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल
Buldhana : भोन येथील प्राचीन बौद्ध वारसा जपण्यासाठी राज्यशासनाने पुढाकार घ्यावा | LokNews24

सिंदखेड राजा : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक हजार वर्षांचा इतिहास मोडून काढीत नवा इतिहास घडवला. त्याचदरम्यान बाबासाहेबांचा इतिहास घडत असतांना देशभरातील त्यांचे निष्ठावान अनुयायी सुद्धा छोटा- मोठा इतिहास घडवण्याचे काम करीत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण यात्रेचे छायाचित्रण करुन नामदेव व्हटकर यांनी एक नवा इतिहास घडवला आहे. या विषयावर येऊ घातलेला परिनिर्वाण चित्रपट इतिहास घडवेल, असा विश्वास  चित्रपटाचे निर्माता सुनील शेळके यांनी व्यक्त केला.

मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे ३ मे रोजी राष्ट्रमाता जिजाऊ, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुनील शेळके म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण हा भावनिक विषय आहे. हा विषय माझ्याकडे आला त्यावेळी मी सुद्धा भावनिक झालो. प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा असे भारताचे थोर सुपुत्र  म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. त्यांचे अतुलनीय कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. परिनिर्वाण चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचे विचार जनमानसांत रुजण्यास मोठी मदत होणार आहे. चित्रपट हे एक प्रभावी प्रसार माध्यम आहे. याद्वारे बाबासाहेबांचा विचार मोठ्या प्रमाणात पुढे येईल. 

बाबासाहेबांचा वैश्विक विचार स्वीकारा – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रखर देशभक्त, स्त्री मुक्तीदाता, घटनेचे शिल्पकार, दीन, दुबळ्यांचे कैवारी अशी अनेक विशेषणे लावली जातात. मात्र ही विशेषणे कमी पडतील एवढे मोठे त्यांचे व्यक्तिमत्व होते. बाबासाहेबांचा विचार हा वैश्विक विचार आहे. जगाने हा विचार स्वीकारलाय. आपणही हा वैश्विक विचार स्वीकारावा, असे आवाहन सुनील शेळके यांनी केले. बाबासाहेबांनी देशाला, संपूर्ण मानवजातीला भरपूर काही दिले आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत चित्रपट करतांना फार मोठी शक्ती माझ्या पाठीशी उभी राहणार आहे. व्यावसायिकदृष्ट्या मी फक्त एवढाच विचार केला आहे. हा चित्रपट लवकर पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. 

नामदेव व्हटकर ध्येयवादी नायक – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महापरिनिर्वाण यात्रा चिरकाल स्मरणात राहावी यासाठी नामदेव व्हटकर नामक छायाचित्रकाराने अपार मेहनत घेतली. त्यांना यासाठी खूप संघर्ष करावा लागला. अनंत आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र त्यांनी धीर सोडला नाही. महापरिनिर्वाण यात्रेचे छायाचित्रण पूर्ण केले. तांत्रिक जोड देऊन त्याचे जतन केले. व्हटकर यांच्यामुळेच आपणास महामानवाची महापरिनिर्वाण  यात्रा बघता आली. त्यांचा संघर्ष हाच परिनिर्वाण चित्रपटाचा मुख्य आशय आहे. ते एक ध्येयवादी नायक असल्याचे सुनील शेळके यांनी सांगितले.

COMMENTS