Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील परीची हिंदी मालिकेत एन्ट्री

झी मराठीवर काहीच महिने सुरू चाललेली 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका विशेष लोकप्रिय झाली होती. या मालिकेने अल्पावधीच प्रेक्षकांचे मन जिंकले. यश चौध

अभिनेता गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
पंजशीरच्या खोर्‍यात 350 तालिबान्यांचा खात्मा
जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या मुलाला जन्मठेप | LOKNews24

झी मराठीवर काहीच महिने सुरू चाललेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका विशेष लोकप्रिय झाली होती. या मालिकेने अल्पावधीच प्रेक्षकांचे मन जिंकले. यश चौधरीच्या भूमिकेतील श्रेयस तळपदे, नेहा कामतच्या भूमिकेतील प्रार्थना बेहरे या कलाकारांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले. मात्र सर्वाधिक प्रेम मिळाले ते परी कामत अर्थात बालकलाकार मायरा वायकुळला. मालिका संपल्यानंतरही मायरा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जोडलेली होती. आता मायराच्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. सर्वांच्या लाडक्या परीला आता पुन्हा एकदा टीव्हीवर पाहता येणार आहे आणि तेही नव्या भूमिकेत. मायराची ही नवी भूमिका खूपच खास असणार आहे. मायराची ही नवी भूमिका खूप खास याकरता आहे कारण या नव्या मालिकेत ती शीर्षक भूमिकेत दिसणार आहे. शिवाय यावेळी ती मराठी नव्हे तर हिंदीत काम करताना दिसेल. मायराच्या नव्या मालिकेचं नाव ‘नीरजा: एक नयी पहचान’ असं असून ही मालिका कलर्स टीव्हीवर पाहता येईल. मायराच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘नीरजा’ मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यात ती अभिनेत्री स्नेहा वाघसोबत स्क्रिन शेअर करताना दिसतेय. नीरजाच्या प्रोमोमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, नीरजा अर्थात मायराला घराबाहेर पडण्याची इच्छा असते. मात्र तिची आई (स्नेहा वाघ) काही कारणास्तव तिला घराबाहेर पडू देत नसते, यामध्ये तिच्या आईचा नाईलाज असतो. आता यामागचे नेमके कारण काय हे मालिका सुरू झाल्यानंतरच लक्षात येईल. दरम्यान ‘नीरजा’ साकारताना परीचा लूक मात्र पूर्णपणे बदलला आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये परीचे केस छोटे होते आणि बऱ्याचदा ती फ्रॉकमध्ये असायची. मात्र नीरजा साकारताना मायरा लांबसडक केस मिरवत आहे, शिवाय तिने पंजाबी सूट आणि मोजडी असा लूक केला आहे

COMMENTS