Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवण्याची पालकांची जबाबदारी ः डॉ. गाडेकर

शिर्डी/प्रतिनिधी ः ऑनलाइन अभ्यासाच्या नावाखाली मोबाईलचा वापर तासनतास वाढला असून शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सुट्ट्यांमध्ये हा वापर अधिक ह

जायकवाडीला पाणी सोडण्याचा घातक निर्णय शासनाने घेऊ नये ः शिंदे
ठाकरेंच्या समर्थनार्थ जिल्हा शिवसेनेचा उद्या नगरला मेळावा
लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

शिर्डी/प्रतिनिधी ः ऑनलाइन अभ्यासाच्या नावाखाली मोबाईलचा वापर तासनतास वाढला असून शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सुट्ट्यांमध्ये हा वापर अधिक होणार आहे अपवाद वगळता अनेक मुले मोबाईलच्या आहारी जाऊन नको त्या गोष्टींना जास्त महत्त्व देताहेत ही भावी पिढीच्या दृष्टीने धोक्याची घंटा असून पालकांकरिता चिंतेची बाब ठरणार आहे मोबाईलचा अनावश्यक व अतिवापर चुकीच्या गोष्टींच्या आहारी जाणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्ट्या व भावी आयुष्याकरिता घातक ठरणार आहे या मोबाईलच्या व्यसनांपासून अर्थात वापरापासून मुलांना दूर करण्याकरिता पालकांनी स्वतः अधिक सजग राहून मुला मुलींना विविध क्रीडा प्रकार तसेच आवडीचे पर्यटन अथवा कौटुंबिक कामे याकडे आकर्षित करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉक्टर के. वाय. गाडेकर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी केले आहे.
राहाता येथील डॉक्टर के वाय गाडेकर माध्यमिक विद्यालय येथे मोबाईल आणि मानव याविषयावर झालेल्या छोटेखानी चर्चासत्रात पतसंस्थेचे चेअरमन डॉ स्वाधीन गाडेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप शिरसाठ होते याप्रसंगी डॉ स्वाधीन गाडेकर म्हणाले मोबाईलच्या अतिवापराने अनेक मुला मुलींना नेत्रविकार पाठीचे मानेचे त्रास यासह इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे त्याचबरोबर मोबाईल वरील गेम तसेच इतर चुकीच्या गोष्टींचे आकर्षण यामुळे अनेक मुले वेगळ्या वाटेकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच प्रौढ व्यक्तींमध्येही मोबाईलचे प्रमाण अधिक वाढले असून तासंतास मोबाईलला वेळ देत आपल्या आरोग्यावर ते परिणाम करून घेताहेत अनेक ठिकाणी मोबाईल मुळे कौटुंबिक व इतर कलह सुद्धा निर्माण होत आहे या सर्व बाबींचा विचार केला तर डिजिटल युगात मोबाईल अथवा तंत्रज्ञान काळाची गरज असली तरी या तंत्रज्ञानाचा व मोबाईलचा जर चुकीचा वापर झाला तर तो अनेक धोके निर्माण करू शकतो हे तितकेच खरे आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवून मोबाईलच्या वापरास योग्य तितकाच वेळ दिला पाहिजे मोबाईलच्या वापराने अनेकांच्या झोपा सुद्धा उडाल्या आहेत त्याचा परिणाम भविष्यकाळात त्यांना जाणवेल आताची मुले अर्थात भावी पिढी ही राष्ट्राची खरी व मोठी संपत्ती आहे संस्कार शिक्षण व शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्य याद्वारे ही पिढी अधिक मजबूत व्हावी म्हणून पालकांनी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुलांना स्विमिंग सायकलिंग इंडोअर गेम बुद्धिबळ यासह इतर मैदानी खेळ व व्यायामाकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावेत त्याचबरोबर गावे व शहरातील समाजसेवी संस्था विविध संघटना यांनी विविध क्रीडा स्पर्धांचे बौद्धिक खेळांचे व मानसिक स्वास्थ्य जपणार्‍या उपक्रमांचे आयोजन करून या पिढीला मोबाईल च्या अतिवापरापासून रोखण्याकरिता प्रयत्न करणे भावी दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे या पद्धतीमुळे अनावश्यक व अयोग्य मोबाईल वापरास प्रतिबंध करणे शक्य असल्याचे या वेळी डॉ स्वाधीन गाडेकर यांनी सांगितले.

COMMENTS