नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी उपस्थितीचा प्रश्न कायम असतो. त्यात शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा देखील आहेत. यामुळे शाळेत वर्ग
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी उपस्थितीचा प्रश्न कायम असतो. त्यात शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा देखील आहेत. यामुळे शाळेत वर्ग जास्त व शिक्षक कमी असे चित्र पाहावयास मिळत असते. तळोदा तालुक्यातील वरपाडा येथील शाळेत देखील शिक्षक नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेला पालकांनी कुलूप लावले आहे. एकीकडे सरकार शिक्षण हक्काच्या कायद्याच्या मोठया गप्पा करत असते. मात्र सातपुड्याच्या आदिवासी भागात शाळांवर शिक्षक येत नसल्याने शाळेला पालकांनी कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तळोदा तालुक्यातील वरपाडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एक ते चार वर्गांसाठी जिल्हा परिषदेकडून दोन शिक्षक दिले. मात्र त्यापैकी एक शिक्षक तीन वर्षांपासून गैरहजर असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
COMMENTS