नाशिक- मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, ज्योती कोल्हे, सुरेखा आवारे यांच्या समवेत आज *ब्राईट इंग्लिश मीडियम स्कू

नाशिक– मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, ज्योती कोल्हे, सुरेखा आवारे यांच्या समवेत आज *ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूल वाडीव-हे ‘* *येथे “पालक शिक्षक सभा”* आयोजित करण्यात आली .कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली. सरस्वती पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा आवारे व इतर मान्यवरांनी केले. त्याचबरोबर पालक शिक्षक सभेची स्थापना करून शालेय विद्यार्थी कौशल्या बरोबरच पालकांना असलेल्या प्रश्नांची देवाण-घेवाण करणे गरजेचे असते. त्यासाठी पालक व शिक्षक सभा ही आयोजित करत असतो. शिक्षकांनी पालकांशी सौजन्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या बाबी समजून सांगितल्या. त्याबद्दल सर्व पालक समाधानी होते. या कार्यक्रम प्रसंगी महेंद्र आढाव, लगीन वाडेकर व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते .
COMMENTS