Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोपट कुंभार बंधुता काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मनीत

इस्लामपूर / प्रतिनिधी : कामेरी, (ता. वाळवा) येथील कवि पोपट कुंभार यांना बंधुता काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मानीत करणेत आले. पुणे येथे आयोजित 25

मिलिटरी आपशिंगेच्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू
पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी बलाढ्य तर विकास आघाडीसमोर ऐक्याचे आव्हान
कामावर हजर होणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना अडवू नका; अन्यथा गुन्हे दाखल करू

इस्लामपूर / प्रतिनिधी : कामेरी, (ता. वाळवा) येथील कवि पोपट कुंभार यांना बंधुता काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मानीत करणेत आले. पुणे येथे आयोजित 25 वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात पुरस्काराचे वितरण संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे आणि प्रमुख निमंत्रक प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा माधुश्री ओव्हाळ, स्वागताध्यक्ष ज्येष्ठ कवी चंद्रकांत वानखेडे, उद्घाटक डॉ. मनोहर जाधव, पुर्वाध्यक्ष प्रा. शंकर आथर, सौ. मंदाताई रोकडे यांच्या हस्ते बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार वितरण करण्यात आले.
पोपट कुंभार यांचे काव्यरत्न, काव्यगंध हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहे. ते उत्तम सुत्रसंचालन, रांगोळीकार, व सामाजिक उपक्रमात अग्रभागी तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. यावेळी गुलाबराजा फुलमाळी, तुकाराम कांबळे, विनायक चिखलीकर, सौ. स्नेहल चौधरी, सौ. दिपाली वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

COMMENTS