Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पांडूरंग माने यांची भाजप प्रदेश सचिवपदी नियुक्ती

जामखेड ः जामखेड येथील पांडुरंग माने यांची महाराष्ट्र राज्य भाजप किसान (मोर्चा) आघाडी प्रदेश सचिवपदी नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीचे माजी मंत्

पाथर्डी तालुक्यातील करडवाडी गावात दारूबंदी करावी
पुणतांबा रेल्वे स्थानकावर जलद गाडयांना थांबा मिळावा ः संध्या थोरात
वाळू तस्कराचा महसूल पथकातील तलाठ्यावर हल्ला

जामखेड ः जामखेड येथील पांडुरंग माने यांची महाराष्ट्र राज्य भाजप किसान (मोर्चा) आघाडी प्रदेश सचिवपदी नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीचे माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते  पुणे येथे  नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी बोलताना पांडुरंग माने म्हणाले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री. आमचे नेते आ. प्रा.राम शिंदे, प्रदेश अध्यक्ष भाजपा किसान आघाडी गणेश (तात्या) भेगडे यांचे मनापासून आभार मानतो तसेच पक्षाने जो माझ्यावर विश्‍वास दाखविला तो मी नक्कीच ठरवेल. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेल. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे सतत प्रमाणिक काम करीन.

COMMENTS