Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोनेवाडी विविध कार्यकारी सोसायटीवर पांडुरंग काळे व संपत दळवी बिनविरोध

सोनेवाडी सोसायटीवर स्वीकृत संचालकपदी पांडुरंग कुशाबा काळे तसेच संपत नाथा दळवी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

अहमदनगर  प्रतिनिधी- तालुक्यातील सोनेवाडी (चास) विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, सोनेवाडी सोसायटीवर स्वीकृत संचालकपदी पांडुरंग कुशाब

संगमनेरात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक 
दैव बलवत्तर म्हणून बिबट्यापासून वाचला जीव
25 तलाठी कार्यालयांसाठी 5.33 कोटींची निविदा प्रसिद्ध

अहमदनगर  प्रतिनिधी– तालुक्यातील सोनेवाडी (चास) विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, सोनेवाडी सोसायटीवर स्वीकृत संचालकपदी पांडुरंग कुशाबा काळे तसेच संपत नाथा दळवी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडीनंतर नवनियुक्त संचालकांनी सोसायटीसाठी सकारात्मक काम करण्याचे आश्‍वासन दिले. सोसायटीचा सर्वांगीण विकास व्हावा  व स्वच्छ कारभार करण्याचा ध्यास घेऊन शेतकर्‍यांचे हित जोपासले जाईल, असे सांगितले. निवडीबद्दल त्यांनी शेतकरीवर्ग व ग्रामस्थांचे आभार मानले.
सोसायटीचे चेअरमन अरुण नारायण दळवी तसेच व्हाईस चेअरमन आशाबाई संतोष आमले, संचालक व माजी चेअरमन  शिवाजी तुकाराम सुंबे, माजी चेअरमन भाऊ पाटील दळवी,  माजी चेअरमन  व जिल्हा  परिषद  सदस्य  सुरेश  सुंबे, सेक्रेटरी म्हस्के, संचालक शरद दळवी, आशाबाई आबा दळवी, अर्जुन वारे, वसंत दळवी, अंबादास दादा बोरगे, बापू श्रीपती दळवी, दत्तात्रय काशिनाथ भुतारे तसेच ग्रामपंचायत सदस्य सरपंच दिलीप सुंबे, उपसरपंच नितीन दळवी, नंदू दळवी, विनोद बोरगे आणि सोनेवाडीतील प्रतिष्ठित अनिल दळवी पाटील, विठ्ठल दळवी, विकास हरिभाऊ गोबरे, संतोष महाराज सुंबे, राजेंद्र वारे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS