Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयभवानीत आवतरली पंढरी

विठ्ठल नामाच्या गजराने शिक्षण संकुल दुमदुमले

गेवराई वार्ताहर - आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जयभवानी शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर करुन वातावरणात चैतन्य निर्माण केले. सजवलेल

दलित अत्याचारासंदर्भात तक्रारी आता कमी झाल्या ; अल्पसंख्याक आयोग अध्यक्षांचा दावा
टाळेबंदीच्या भीतीने खरेदीसाठी मोठी झुंबड
मुंबईत सीएनजीच्या अडीच रूपयांची दरात कपात

गेवराई वार्ताहर – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जयभवानी शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर करुन वातावरणात चैतन्य निर्माण केले. सजवलेले विठ्ठल रुक्मिणी, वारकरी आणि उपस्थित विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषांनी जयभवानी शिक्षण संकूलात पंढरीच आवतरली होती.
जयभवानी विद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत राठोड, उपमुख्याध्यापक रणजित सानप आणि पर्यवेक्षक कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर एका छोट्या हरिनाम सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी दिंडीचेही आयोजन केले होते. विद्यार्थी आणि शिक्षकांनी फुगड्या खेळल्या. संगित विभागाचे प्रमुख राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीगिते, अभंग आणि गवळणी सादर केल्या. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सर्वश्रेष्ठ हरिभाऊ हकाळे, सुदाम शेजाळ, सुधाकर देशमुख, कल्याण सानप, मनोहर बने, गणपत डोंगरे, वसंत परदेशी, किशोर सोनवणे, धर्मराज खेडकर, दादा तळेकर, चंद्रकांत पवार, दिपक शिंदे, विलास मोटे, गणेश जेधे, आकाश आडे, श्रीराम शिंदे, श्रीमती वराट, श्रीमती खरात, श्रीमती ससाणे यांच्यासह विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS