Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात स्वागत

सातारा / प्रतिनिधी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय

विमानांच्या आवाजाने बंकरमध्ये जीव मुठीत : सौरभ जाधव याचा थरारक अनुभव
नगरविकास आराखड्या विरोधात मेढ्यात शेतकर्‍यांचे आंदोलन; प्रास्तावित आराखडयाची होळी
जवळवाडीच्या महिला सरपंचाकडून अवैध दारू विक्री करणार्‍यावर झडप

सातारा / प्रतिनिधी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले. फडफडणार्‍या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाला.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, खा. नितीन पाटील, आ. सचिन पाटील, आ. मनोज घोरपडे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी वाईचे प्रांतअधिकारी राजेंद्र कचरे यांनी पुष्प अर्पण करुन व पोलीस बँड पथकामार्फत विविध धून वाजून स्वागत केले.
नीरा नदीतील स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी तसेच लाखो भाविकांनी दर्शन घेतले. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा 2025 निमित्त वारकर्‍यांच्या सेवेसाठी गावनिहाय सुविधा माहिती व लोकेशन मार्गदर्शनाचा क्यूआर कोड हीींिीं://ीारीींरिपलहरूरीं.ळप/रिश्ररज्ञहळ/ पंचायत समिती खंडाळा व फलटण यांनी पहिल्यांदा तयार केला आहे. याद्वारे वारकर्‍यांच्या सोयीसाठी काही गावांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या माध्यमातून प्रत्येक गावातील शौचालय, आरोग्य सेवा, पाणी, महिला स्नानगृहे, मुक्काम, निवास, पेट्रोल पंप व संपर्क माहिती मिळत आहे.
प्रशासनाने वारकर्‍यांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाण्याचे टँकर, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच जागोजागी स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे.

COMMENTS