नाशिक प्रतिनिधी - मखमलाबाद येथील स्वामी विवेकानंद नगर परिसरामध्ये दुर्गा मातेचे मंदिर उभारण्यात आले असून, त्या ठिकाणी दुर्गा मातेची जवळपास 30

नाशिक प्रतिनिधी – मखमलाबाद येथील स्वामी विवेकानंद नगर परिसरामध्ये दुर्गा मातेचे मंदिर उभारण्यात आले असून, त्या ठिकाणी दुर्गा मातेची जवळपास 30 वर्षांपूर्वी पासून परिसरातील नागरिक पूजा करत असलेल्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे, यावेळी मूर्ती स्थापन करत असताना ओम दुर्गा माता मित्र मंडळाच्या वतीने पारंपारिक पद्धतीने दुर्गादेवीचा पालखी सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे, यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पालखी सोहळ्याची विधिवत पूजा करून सुरुवात करण्यात आली, यावेळी ओम दुर्गा माता उद्यानाचे देखील उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,
या पालखी सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी सह्याद्री शिक्षण प्रसारक व समाज विकास मंडळ ,नाशिक संचलित
अमर बन्सीलाल छाजेड जागृती श्रवण विकास विद्यालयाच्या मूकबधिर विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने शिस्तबद्ध पद्धतीने लेझीमच्या तालावर ठेका धरत परिसरातील नागरिकांचे मन जिंकली, या कार्यक्रमासाठी मा.नगरसेवक पुंडलिक खोडे त्याचबरोबर मा.नगरसेविका सुनीता पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पिंगळे हे उपस्थित होते, त्यावेळी परिसरातील नागरिकांनी या पालखी सोहळ्यामध्ये आपला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत मनमुराद नाचण्याचा व फुगडी खेळण्याचा आनंद लुटला आहे, या मान्यवरांमध्ये सामाजिक कार्यकर्ते पै.वाळू काकड त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढविली आहे, तसेच नाशिक नवनिर्मिती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमांमध्ये आपले मोलाचे सहकार्य देत कार्यक्रमाची शोभा वाढविली आहे.
COMMENTS