श्रीगोंदा : 16 ते 22 जुलै 2024 दरम्यान थायलंड येथे होणार्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती (55 किलो) स्पर्धेसाठी 20 वर्षाखालील वयोगटामध्ये महाराजा जि
श्रीगोंदा : 16 ते 22 जुलै 2024 दरम्यान थायलंड येथे होणार्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती (55 किलो) स्पर्धेसाठी 20 वर्षाखालील वयोगटामध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाची पै. धनश्री फंड हिची भारतीय संघात निवड झाली. इंटरनॅशनल कुस्ती संकुलाचे प्रमुख हनुमंत फंड यांच्या दोन्ही कन्या पै. धनश्री फंड व पै. भाग्यश्री फंड ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतात. श्रीगोंदा तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. पै. धनश्री फंड हिची मोठी बहिण पै. भाग्यश्री फंड हीने दोन वेळा महिला महाराष्ट्र केसरी बहुमान प्राप्त करून व आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी कुस्तीगीर म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीगोंदा तालुक्याचा हा महिला कुस्तीचा सुवर्णकाळच होय.
पै. धनश्री फंडच्या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन आमदार बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राहुल दादा जगताप, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, महावीर पटवा, महाविद्यालयाचे प्र- प्राचार्य प्रो. डॉ.महादेव जरे, उपप्राचार्य प्रो.डॉ. प्रकाश साळवे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुदाम भुजबळ, जिमखाना विभाग प्रमुख प्रा.संजय अहिवळे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालिका प्रा.कल्पना बागुल , श्री. हनुमंत फंड, सौ. पूजा फंड व श्री. प्रतीक सातव यांचे मार्गदर्शन लाभले.
COMMENTS