ठाणे/प्रतिनिधी ः अनंत करमुसे मारहाण प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या पीएला तडीपार क

ठाणे/प्रतिनिधी ः अनंत करमुसे मारहाण प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या पीएला तडीपार करण्यात आलं आहे. ठाणे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघर जिल्ह्यातून आव्हाडांच्या पीएला तडीपार करण्यात आले आहे. अभिजित पवार असे आव्हाडांच्या पीएचे नाव आहे. अभिजित पवार यांच्या विरोधात अनंत करमुसे मारहाण तसेच इतर काही प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ठाणे पोलिसांकडून तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
COMMENTS