राहाता ः शनिचौक मित्र मंडळ, राहाता यांनी आयोजित केलेल्या भव्य, श्री गणेश उत्सव-2024 निमित्ताने समाजातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवर
राहाता ः शनिचौक मित्र मंडळ, राहाता यांनी आयोजित केलेल्या भव्य, श्री गणेश उत्सव-2024 निमित्ताने समाजातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आणि बक्षीस व पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम राहाता येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके, सहकार महर्षी स्व.शंकरराव कोल्हे, स.सा.का.चे चेअरमन विवेक भैय्या कोल्हे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, भास्करराव भगरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कृषिभूषण प्रभावती घोगरे, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शनिचौक मित्र मंडळ, राहाताच्या सर्व सदस्य व कमिटीच्या वतीने त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले. त्यानंतर अध्यक्षीय सुचना.योगेश बोठे यांनी केले तर सुचणेस अनुमोदन निलेश कार्ले यांनी दिले. त्यानंतर प्रास्ताविक रणजित बोठे यांनी केले. ते म्हणाले की, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरु केलेला सार्वजनिक उत्सवाची प्रेरणा घेऊन हा उत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यातच या परिसराला गणेश परिसर म्हणून मोठी ओळख आहे. मंडळाने डी.जे, गुलाल, फटाके ही संकल्पना कायमचीच हद्दपार करत हा बाप्पाचा उत्सव सामाजिक, धार्मिक कार्यक्रम हाती घेऊन साजरा करत आहे. त्यात रक्तदान, वृक्षारोपण, चित्रकला स्पर्धा, महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, या धार्मिक गणेश उस्तवात अतिशय सुरेख नियोजन या मंडळाने केले. खरतर महाराष्ट्रात प्रथमच डी.जे गुलाल, फटाके मुक्त असा श्री गणेश उत्सव या मंडळाने विविध उपक्रम व धार्मिक कार्यक्रम हाती घेऊन साजरा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर मंडळे निश्चितच या मंडळाचा आदर्श घेऊन या निर्णयाची नोंद घेतील. यात शंकाच नाही.
COMMENTS