रस्त्यावर भांडणे करू नका म्हटल्याच्या रागातून विनयभंग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्त्यावर भांडणे करू नका म्हटल्याच्या रागातून विनयभंग

अहमदनगर/प्रतिनिधी : रस्त्यावर भांडण करू नका असे म्हटल्याच्या रागातून मंगलगेट येथील एका तरुणाने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिला जखमी केल

अष्टशताब्दी वर्षनिमित्त कोपरगाव तालुक्यातील रस्ता करावा
आमदार आशुतोष काळेंनी भाविकांना केले फराळ वाटप
साखर निर्यातीऐवजी इथेनॉल निर्मितीला आर्थिक सहाय्य द्यावे

अहमदनगर/प्रतिनिधी : रस्त्यावर भांडण करू नका असे म्हटल्याच्या रागातून मंगलगेट येथील एका तरुणाने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिला जखमी केल्याची घटना घडली असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू ठोंबे (रा. मंगलगेट) असे आरोपीचे नाव आहे.
मंगल गेट भागामध्ये या घटनेतील महिलेच्या घरासमोर ठोंबे याचे जोरदार भांडण सुरू होते, ते पाहून त्या महिलेने व त्याच्या मुलाने तुम्ही रस्त्यावर भांडण करू नका असे सांगण्याचा प्रयत्न केला, याचा राग सोनूला आल्यानंतर सोनू याने त्या महिलेच्या घरामध्ये प्रवेश करीत महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत तिच्या तोंडावर जबरदस्त मारहाण केल्याची घटना घडली. संबंधित महिला सरकारी नोकर आहे. तिने या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर तिच्या तक्रारीवरून आरोपी सोनू याच्याविरुद्ध कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.

COMMENTS