देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येचा उद्रेक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येचा उद्रेक

24 तासात आढळले 3 तीन 47 हजार कोरोना रुग्ण

नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येचा आकडा कमी होतांना दिसून येत होता. मात्र शुक्रवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येचा उद

संगमनेरमध्ये महानगर बँकेची बनावट सोने तारणप्रकरणी 83 लाखाची फसवणूक
राज्याच्या अर्थव्यवस्थेत 7.6 टक्क्यांची वाढ
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आयकरसंदर्भात मोठी घोषणा

नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येचा आकडा कमी होतांना दिसून येत होता. मात्र शुक्रवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येचा उद्रेक झाल्याचे पहायला मिळाले. देशात गेल्या 24 तासात 3 लाख 47 हजार 254 नवे कोरोना रुग्ण आढळले आले असून, तामिळनाडू राज्यात लॉकडाऊन करण्याची घोषणा तिथल्या सरकारने केली.
परवाच्या तुलनेत तब्बल 29,722 अधिक रुग्ण आढळले आहेत. तसेच 703 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 20,18,825 सक्रीय रुग्ण आहेत. कोरोना संसर्गाच्या तिसर्‍या लाटेत महाराष्ट्रासह कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत सर्वाधिक सक्रिय रूग्ण आढळत असून ही चिंताजनक परिस्थिती असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. महाराष्ट्रासह अन्य दोन राज्यांत केंद्रीय पथके पाठविण्यात आली असून चाचण्या आणि लसीकरण या दोन्हींचे प्रमाण तत्काळ वाढविण्याची सूचना या राज्यांच्या आरोग्य यंत्रणांना करण्यात आल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्रात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 2 टक्क्यांवरून 22 टक्क्यांपर्यंत गेला, ही चिंताजनक बाब असल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. केरळमध्ये कोरोना साथ रोगाचा भीषण प्रकोप झालाय. राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 46 हजार 387 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोरोना संसर्गामुळे राज्यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोरोना मृत्यूच्या यादीत 309 मृत्यूंचा समावेश करण्यात आला आहे. मृतांची संख्या 51,501 झाली आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी केरळमध्ये नवीन कोरोना व्हेरिएंट ओमिक्रॉनची 62 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आता राज्यात ओमिक्रॉनचा एकूण आकडा 707 झाला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत दिल्लीत 12,306 नवीन कोरोना बाधित आढळले आहेत. या दरम्यान, 43 मृत्यूची नोंद झाली आहे. सक्रिय प्रकरणे 68,730 आहेत आणि पॉझिटीव्हिटी रेट हा 21.48 टक्के आहे. यापूर्वी देखील केरळमध्ये ईदेच्या सणाला सोशल डिस्टंन्सीग आणि लॉकडाऊनच्या नियमांचा मोठ्या प्रमाणात भंग झाल्यामुळे कोरोना केसेस प्रचंड वाढल्या होत्या.

COMMENTS