Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आपले किल्ले आपली जबाबदारी : समीर शेख

सुंदरगडावर सातारा पोलीस दलाकडून स्वच्छता मोहीमपाटण / प्रतिनिधी : पाटण महालातील प्रमुख असलेल्या किल्ले सुंदरगड-दातेगडावर आपले किल्ले आपली जबाबदा

कराडकरांची तहान भागविण्यासाठी डॉ. अतुल भोसले मैदानात
कोट्यवधींच्या शेअर मार्केट घोटाळ्याचा भांडाफोड लवकरच होणार
औंधला नळपाणी पुरवठा योजनेसाठी 16 कोटी निधी मंजूर ; श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची माहिती

सुंदरगडावर सातारा पोलीस दलाकडून स्वच्छता मोहीम
पाटण / प्रतिनिधी : पाटण महालातील प्रमुख असलेल्या किल्ले सुंदरगड-दातेगडावर आपले किल्ले आपली जबाबदारी. या मोहिमेअंतर्गत सातारा जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा पोलिस दलाने रविवारी सकाळी गड स्वच्छता मोहीम राबवली. प्रारंभी किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार खंजीर दरवाजातील गणपती, वीरहनुमान, सुंदरेश्‍वर देव- देवतांचे जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या हस्ते सहपत्नीक पुजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हा पोलीस प्रमुख बापू बांगर, आयपीएस अधिकारी- कमलेश मिना, डिवायएसपी विवेक लावंड, पोलीस निरीक्षक विकास पाडळे, पोलीस निरीक्षक उत्तमराव भापकर, घोंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख म्हणाले, छत्रपती शिव कालीन गडकिल्ले हे आपला इतिहासीक अनुमोल ठेवा आहे. या गडकिल्ल्यांचे जतन व त्यांचे संवर्धन करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सातारा पोलीस दलाने राबविलेल्या आपले किल्ले आपली जबाबदारी. या मोहिमेअंतर्गत आज सहाव्या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम यशस्वी झाली. या आगोदर स्वच्छता केलेल्या गडावर सहाशे किलोपेक्षा जास्त घणकचरा साफ केला आहे. मात्र, येथील सुंदरगड संवर्धन समीतीच्या मावळ्यांनी गड स्वच्छ ठेवल्याने गडावर फार स्वच्छता करावी लागली नाही. गड स्वच्छतेसाठी फिरुन पाहताना गडावरील इतिहासीक अवशेष कातळ खडकात खोदलेला खंजीर दरवाजा, गणपती, वीरहनुमान मुर्ती, गडावरील गडदेवता श्री भवानी मातेचे स्थान, इतिहासीक वाडे-वस्ती, कचेरी यांचे पडलेल्या अवस्थेतील अवशेष, त्याच बरोबर कातळ खडकात खोदलेले कोठारे, पागा, पाण्याचे टाके तसेच गडावरील मुख्य अवशेष भव्य तलवार विहीर व त्यामधील शिवलिंग मंदिर हा गडाचा इतिहासीक अनुमोल ठेवा पाहता आला. यावेळी गड संवर्धन समीतीच्या मावळ्यांनी गडावरील प्रत्येक वास्तूची व अवशेषांची माहिती दिली. हा इतिहासिक अनुमोल ठेवा आपल्या पुढील पिढीसाठी जतन होणे महत्त्वाचे आहे. तरच पुढच्या पिढीला आपल्या पुर्वजांचा इतिहास समजणार आहे. याबरोबर गडावरून आजुबाजूचा परिसर पाहताना या गडाला निसर्ग संपदा भरपूर आहे. नावाप्रमाणेच हा सुंदरगड आहे, असे सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख म्हणाले.

COMMENTS