Homeताज्या बातम्यासंपादकीय

माज जिरवण्यासाठी आमची व लोकमंथनची ख्याती !

अजातशत्रू असणारं व्यक्तिमत्त्व आम्ही आमच्या जीवनात नुसतं पाहिलं नाही, तर अक्षरशः अनुभवलं! मैत्री पलीकडचं मातृवत प्रेम ज्यांनी आपल्या भोवतालच्या स

चौकशी समितीची शिफारस, सेबी’ने करावी चौकशी !
सत्ताधारी जातवर्गाला सत्तेचे अपचन!
प्रा. हाके यांच्यावर झुंडशाहीचा हल्ला गंभीर!

अजातशत्रू असणारं व्यक्तिमत्त्व आम्ही आमच्या जीवनात नुसतं पाहिलं नाही, तर अक्षरशः अनुभवलं! मैत्री पलीकडचं मातृवत प्रेम ज्यांनी आपल्या भोवतालच्या सर्वांना दिले; ज्यांना काम, काम आणि केवळ काम यापलिकडे कसलाही विचार शिवत नाही, ते आमचे मित्रवर्य आणि मार्गदर्शक असणारे अनिलकुमार गायकवाड यांच्याशी आमची मैत्री 1982 पासूनची. आजमितीला चाळीस वर्षे पूर्ण होताहेत. अनिलकुमार गायकवाड यांनी आपल्या जीवनातील पहिली नोकरी जलसंपदा विभागात केली होती. त्यानंतर दोन वर्षे त्यांनी प्राध्यापकी केली. त्याकाळापासून आमचा मैत्रीसंबंध राहीला! त्यांच्या कार्याने केवळ सर्वसामान्य लोकांनाच नव्हे तर राज्य शासनाला देखील दिपवलं! त्यातूनच त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाने दोन वेळा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार दिला. बांधकाम विभागात 1989 साली दाखल झालेले अनिलकुमार गायकवाड यांनी पाहता पाहता उभा महाराष्ट्र आपल्या अभियांत्रिकी कौशल्याने आपलासा तर केलाच, परंतु, जगभरातील अयियंत्यांना हेवा वाटावा, एवढं दैदिप्यमान उभारणी कार्य त्यांनी महाराष्ट्रासाठी केले. वेग आणि विकास याचे समीकरण बनलेल्या मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे, मुंबईत आश्‍चर्य ठरलेला वरळी सी-लिंक, ठाणे, मुंबईतील सर्व उड्डाणपूले, मुंबईतील विलासराव देशमुख फ्री वे, महाराष्ट्राचा संपूर्ण कारभार जेथून चालतो त्या मंत्रालयाच्या इमारतीचे आधुनिकीकरण, मुंबई हायकोर्ट दुरूस्ती, हाय माऊंट बिल्डिंग, सह्याद्री इमारत, देशाच्या राजधानी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन, लातूर येथे उभारला गेलेला नव्या तंत्रज्ञानाचा हायब्रीड पूल, नदीवर सर्वात उंच उभारला गेलेला लोखंडी पूल, देशातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आणि माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्राच्या वर्तमान राजकारणाचे धुरंधर नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रत्यक्षात साकार करणारे, अनिलकुमार गायकवाड यांच्याशी आमचे पूर्वापार असण्याच्या संबंधाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही अप्पलपोट्या प्रवृत्तीचे लोक करीत आहेत. त्यांना आम्ही निक्षून एवढेच सांगू इच्छितो की, अनिलकुमार गायकवाड यांच्या कार्यसंस्कृतीत आम्ही वावरलो आहोत. त्यांचे कार्य इतके व्यापक आणि सतत क्रियाशिलतेचे असल्याने त्यांच्याकडे नकारात्मक विचार करण्यास वेळच नाही; किंबहुना, नकाराला नकार हा त्यांचा स्थायीभाव असल्याने त्यांनी एकाहून एक महत्वपूर्ण प्रकल्प साकारून महाराष्ट्र समृद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. मात्र, अशा क्रियाशील व्यक्तिमत्वाचा वेळ वाया घालविण्यासाठी काही विघातक प्रवृत्ती त्यांच्या अवतीभवती टपलेल्या आहेत. परंतु, गायकवाड साहेबांना चांगलंच ठाऊक आहे की, अशा प्रवृत्तींच्या नादी लागू नये. कारण, अशा उपद्रवी प्रवृत्ती या सर्वत्र असतात आणि त्यांच्या मागे लागलो तर आपले कार्य मागे पडेल. परंतु, अशा दुर्लक्षानेही जेव्हा अशा प्रवृत्ती थांबत नाहीत, किंवा कोणाचं तरी नुकसान करावं अशा उद्देशाने त्यांच्याजवळ येणार्‍या नीच प्रवृत्तीच्या लोकांना गायकवाड साहेब भीक घालत नाहीत; हे आम्हाला पुरतं ठाऊक आहे. तरीही, ज्यांची शेपटी वाकडी ती वाकडीच असते, अशी श्‍वापदे सदृश्य प्रवृत्ती गायकवाड साहेबांच्या आजूबाजूला अनेकवेळा वावरताना दिसतात. त्यांना आम्ही एवढाच इशारा देतो की, तुमची शेपटी सरळ होत नसेल तर ती तुमच्याच पार्श्‍वभागात दुमडून टाकण्याचे साहस आणि कला दोन्ही आमच्याकडे आहे. गायकवाड साहेबांना चुकीचे सांगणार्‍या अनेक माजोरड्यांचा माज आम्ही कायदेशीररीत्या यापूर्वी उतरविला आहे. एकदा, हा ताजा ताजा इतिहास जरूर आपल्या नजरेखालून घालावा, एवढेच आम्ही सांगतो. गायकवाड साहेब आणि आमच्यात संबंध बिघडविण्यासाठी प्रयत्नरत असणार्‍या प्रवृत्तींना आम्ही ठेचल्याशिवाय राहत नाही, हे केपी पासून तर अनेक प्रकरणांमध्ये दिसून येईल. तेवढा इतिहास नजरेखालून घालण्याची तसदी घ्यावी! अन्यथा, तुमच्या विघातक प्रवृत्ती आणि त्या प्रवृत्तीतून आलेला माज जिरवण्यासाठी आमची आणि दैनिक लोकमंथनची ख्याती आहे. आमच्या 36 वर्षाच्या पत्रकारितेत आम्ही अनेकांचा माज उतरविला आहे. त्यासाठी भारतीय संविधानाने आम्हाला दिलेल्या अधिकाराचे आम्ही कायदेशीर कक्षेत राहून अनेकांचे माज उतरवले आहेत. त्यामुळे, अनिलकुमार गायकवाड साहेब यांच्याशी आमचे जे संबंध आहेत, ते, आयुष्यातील अतूट ॠणानुबंध आहेत! या ॠणानुबंधाच्या तारांतून सुंदर संगीतच ऐकू येईल! मात्र, या तारांना छिन्नविछिन्न करण्याचा कोणी प्रयत्न केला तर, त्याला आयुष्यभर सुन्न करण्याची आमची कला निश्‍चितपणे दाखवून देऊ! समझणार्‍याला एवढा इशारा खूप आहे! तो समजून घेता आला नाही, तर दोष आमचा नसेल, एवढं ध्यानात घ्या! तूर्तास, इथेच थांबतो.


‘त्या’ झारीतील शुक्राचार्यांना आमचा इशारा – काल आलेल्या झारीतील शुक्राचार्याला त्यांनी खांद्यावर घेतले असले तरी, कुणाच्या नादाला लागून. ज्या झारीतील शुक्राचार्यांनी नवा पट मांडण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना इतकेच निक्षून सांगतो की, त्यांचा भूगोल आम्ही मांडला तर त्यांना अशा पद्धतीचे वागणे महागात पडेल. चांद्यापासून बांद्यापर्यंत रत्नागिरीपासून चर्चगेटपर्यंत त्यांचा इतिहास आणि भूगोल दोन्हीही उलगडून महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजासमोर आणावा लागेल. याची देखील त्यांनी दखल घेणे गरजेचे आहे.

COMMENTS