Homeताज्या बातम्यासंपादकीय

अन्यथा, माणसांची यंत्रे बनतील ! 

जगभरात आयटी सेक्टरमुळे जीवनमानाचे परिमाण बदलले! सहा आकडी पगार, प्रशस्त घरे, महागड्या गाड्या आणि अतिशय उंचीची जीवनशैली; या झगमगटात माणसाच्या भावना

अमेरिकन न्यायालयातील असामाजिकता ! 
संसदीय इतिहासाचा लेखाजोखा आणि बरेघ काही! 
वल्गनाकार आठवले ! 

जगभरात आयटी सेक्टरमुळे जीवनमानाचे परिमाण बदलले! सहा आकडी पगार, प्रशस्त घरे, महागड्या गाड्या आणि अतिशय उंचीची जीवनशैली; या झगमगटात माणसाच्या भावना हरवल्या आणि कृत्रिमता वाढली. जगण्याच्या या झगमगटात स्पर्धा, ही अनायास आली. स्पर्धेतून कोण किती वेगाने आणि किती उत्तम दर्जाने काम करेल, याच विचारांभोवती अडकलेली व्यक्ती, भावनिकदृष्ट्या व्यक्ती म्हणून उरली नाही.  त्याचा अविभाज्य परिणाम आयटी सेक्टर च्या राजधानी ठरलेल्या अनेक शहरांमध्ये व्यक्तीच्या वर्तनातील दुष्परिणाम म्हणून समोर येतो. बेंगलोर ही भारताची आता आयटीसेक्टर ची राजधानी बनली आहे. पुणे हे देखील मोठे आयटी सेक्टर त्याचप्रमाणे हैदराबाद सारखे शहर देखील मोठे आयटी सेक्टर आहेत. अर्थात, देशातील अनेक महानगरे आयटी सेक्टर म्हणून उभी राहिली असताना, तेथील मानवी जीवन आता कशा प्रकारचे राहिले आहे, यावर खरे तर अभ्यास होण्याची गरज आहे. आयटी सेक्टर मधून काही वर्षांपूर्वी आपण अनेक बातम्या ऐकत होतो. आपल्याच सोबत काम करणारा सहकारीचा  खून करणे किंवा अनेक घटना बलात्कार स्वरूपाच्या घडणं, या सामान्य झाल्या होत्या. परंतु जास्त काळ गेला. त्यामध्ये फरक पडला. बेंगलोरची नुकतीच घटना घडली. ती घटना अतिशय धक्कादायक आहे. जगातील कोणतीही स्त्री मातृत्वासाठी आसुसलेली असते. स्त्रीला जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीपेक्षा मातृत्व अधिक प्रिय असते. आजीवन अविवाहित राहणाऱ्या स्त्रिया देखील अलीकडच्या काळात, मुले किंवा मुली दत्तक घेतात. ही गोष्ट आपण समाजात घडताना पाहत असतो. परंतु काल-परवा बेंगलोर मध्ये आयटी सेक्टरचे एक बडे नाव असलेली महिला, गोव्यामध्ये येते; एका मोठ्या हॉटेलमध्ये दोन दिवस निवास करते. जाताना  सहजपणे जात असताना ज्या कर्मचाऱ्यांनी तिला पाहिलं, ती अतिशय सहज भावनेने हॉटेलच्या बाहेर निघून, टॅक्सीत बसून, रवाना झाली. पण, या दरम्यानच्या काळात जो काही घटनाक्रम घडला त्यातून त्या स्त्री विषयीचा असलेला संशय वाढतो आणि मग पोलीस यंत्रणेला फोनाफोनी होते.  त्या फोनाफोनीतून जो घटनाक्रम पुढे येतो त्यातून उलगडतं एक रहस्य! आणि ते म्हणजे त्या स्त्रीने स्वतःच्या पोटच्या गोळ्याला अगदी चार वर्षाचा बालकाचा खून केलेला. सूचना सेठ म्हणजे अलीकडच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जगामध्ये अतिशय प्रबळ ठरू पाहणाऱ्या तंत्रज्ञानाच्या, कंपनीची संस्थापक आणि सीईओ देखील. परंतु, आपल्या चार वर्षाच्या बाळाचा जीव घेताना, तिचा जीव कासावीस झाला नाही. तिच्या भावना हेलावल्या नाही. पोलिसांच्या माहितीनुसार त्या चार वर्षाच्या बाळाला तिने खोकल्याचे अतिरिक्त औषध पाजलेले.  अल्कोहोल देऊन बाळाला निद्रेच्या स्थितीत नेऊन त्याचा गळा घोटला. कदाचित, उशी त्याच्या नाकावर दाबून त्याचा जीव गुदमरुन त्या बालकांचा मृत्यू झाला असावा;  असे पोलीस तपासात आता उघड झाले.  कोणत्याही स्त्रीला आपल्या मुलाचा बळी घ्यावा, अशी मानसिकता का होते? तर त्याची कारणं ही अतिशय झगमगटाचा हे जग आकार घेत असताना, चंगळवादाच्या क्षणभंगुर जीवनामध्ये जे काही अडथळे आपल्या वैयक्तिक जीवनात  येतील ते सहन करायचे नाहीत! ते आपल्या जीवनातून वजा करायचे, अशी मानसिकता आता मोठ्या प्रमाणात रुजू लागली आहे. यापूर्वी देखील शिना बोरा प्रकरणात आपण ही घटना गोष्ट पाहिली की, स्वतःच्या आईनेच तिच्या मुलीचा कशा क्रूर पद्धतीने खून घडवून आणला होता. काहीसा  तसाच घटनाक्रम सूचना सेठ हिने देखील घडवला आहे. यामध्ये रंगेल आणि चंगळवादी जीवनशैली आत्मसात करण्याच्या प्रक्रियेमध्ये, वैयक्तिक भावभावनांचा झालेला साठमारा आणि त्याला मोकळी वाट करून देताना स्वभावामध्ये आलेली क्रूरता आणि त्या कृतीचे अभिन्न अंग म्हणजे कोणाचा तरी बळी घेणं, ही बाब वाटते तेवढी सहज नाही. मानवी जीवनातल्या होणाऱ्या भौतिक बदलांमध्ये ही मानसिक बदलाची नोंद वेळीच घेणं गरजेचे आहे. अन्यथा, माणसाची यंत्र बनून ते एकमेकांच्या विरोधात उभी ठाकण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे, या घटना क्रमानुसारवर माणसाचं जे यंत्र बनत आहे, ते का बनत आहे याचा, अभ्यास करून त्यावर उपाययोजना वेळीच शोधणं, ही आजच्या काळाची गरज आहे.

COMMENTS