Osmanabad : बुडत असलेल्या दोघांचे महिलांनी वाचवले प्राण (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Osmanabad : बुडत असलेल्या दोघांचे महिलांनी वाचवले प्राण (Video)

माढा तालुक्यातील राहुल नगर गावातील सीना नदीच्या पात्रात दोघे जण बुडत असताना प्रसंगावधानता दाखवत गावच्या महिलांनीच त्याचे प्राण वाचवलेत.राधिका राजेंद्

Osmanabad : शेतकरी वर्गांना देण्यात आली कायद्याविषयी माहिती (Video)
Osmanabad : चक्क…आकाशातून पडला दगड (Video)
Osmanabad : परंड्यात विविध मागण्यांसाठी आंदोलन |LokNews24

माढा तालुक्यातील राहुल नगर गावातील सीना नदीच्या पात्रात दोघे जण बुडत असताना प्रसंगावधानता दाखवत गावच्या महिलांनीच त्याचे प्राण वाचवलेत.राधिका राजेंद्र भोई,राणी धोंडीराम भोई अशी त्या दोन  धाडसवान महिलेची नावे असुन प्रितम नंदकुमार शिंदे( वय ९), दिनकर ओहोळ( वय ३८) या दोघांचे प्राण त्यांनी वाचवलेत..

दोन्ही महिलांच्या सतर्कतेमुळे गावावरची मोठी  दुर्घटना टळली आहे.सीना नदीच्या पात्राच्या कडेला प्रितम शिंदे हा खेळत असताना त्याचा तोल गेल्याने तो नदी पात्रात बुडत असल्याची घटना  परिसरात काम करित असलेल्या दिनकर ओहोळ यांना दिसताच प्रितम ला वाचवण्यासाठी त्यांनी नदीत उडी घेतली.मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने दोघे वाहत पुढे चालले होते.

नदी पात्राच्या कडेलाच  कपडे धुवत  असलेल्या दोघीना  आरडा ओरड ऐकू येताच त्यांनी त्या दिशेने धाव घेतली.”तुम्ही आरडा ओरड करु नका  घाबरु नका …आम्ही तुम्हाला सुखरुप बाहेर काढु “असा धीर देत .

दोघींनीही तत्परतेने नदी पात्रात  उतरुन पाण्याच्या प्रवाहात जात  साडी चा आधार घेत त्यांनी स्वत:चा  जीव धोक्यात घालुन पाण्याच्या बाहेर सुखरुप   काढले.जीवावर उदार होऊन दोघांचे प्राण वाचवलेल्या या जिजाऊ सावित्रीच्या लेकीचे गावांसह परिसरातील गावातुन कौतुक होतंय .  

COMMENTS