खुनाच्या आरोपातील जामिनावर सुटलेला आरोपीचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. हा आरोपी पुण्यात राहत असून, तारखेसाठी आला असता त्याचा खून झाला आहे. आरस
खुनाच्या आरोपातील जामिनावर सुटलेला आरोपीचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. हा आरोपी पुण्यात राहत असून, तारखेसाठी आला असता त्याचा खून झाला आहे.
आरसोली, ता. भुम येथील विलास आबासाहेब गोयकर, वय 33 वर्षे यांचा गळ्यावर शस्त्राच्या वाराच्या जखमा असलेला मृतदेह 23 सप्टेंबर रोजी देवळाली ते आरसोली रस्त्यालगतच्या चारीत आढळला. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी विलास याचा खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह त्या चारीत टाकला आहे. अशा माहिती मयताचा भाऊ- दिलीप आबासाहेब गोयकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 201 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे
शेतकरी हनुमंत भास्कर जगदाळे हे सोयाबीनचे रस्त्याच्या कडेला ढिग लावण्यासाठी जागा करत होते. त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत डोके दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर डोळ्यांवर कापडी पट्टी लावलेल्या व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. त्यामुळे त्यांनी देवळालीचे सरपंच सचिन माने यांना याबाबतची माहिती दिली. माने यांनी परंडा पोलिसांना फोन करुन माहिती दिली. त्यानंतर तत्काळ पोलिस घटनास्थळी आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक सुनिल गिड्डे यांनी मृतदेहाची पाहणी करून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कळवले. गिड्डे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
COMMENTS