श्रीगोंदा : व्यंकनाथ महाराज मंदिर सभामंडप लोणीव्यंकनाथ येथे श्री. संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त श्री. संत मंदिर सभा मंडपाचे भूमीपूजन व लोणी व्यं

श्रीगोंदा : व्यंकनाथ महाराज मंदिर सभामंडप लोणीव्यंकनाथ येथे श्री. संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त श्री. संत मंदिर सभा मंडपाचे भूमीपूजन व लोणी व्यंकनाथ गावाचे सुपुत्र आाणि विधानपरिषदेचे आमदार अमीत गोरखे यांचा सत्कार लोणी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केला आहे. माजी मंत्री विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. यावेळी आण्णासाहेब शेलार, सावता हिरवे, अनुराधाताई राजेंद्र नागवडे, वसंतराव गुंड, भगवान फुलसौंदर यांच्यासह लोणी व्यंकनाथ गावचेआजी-माजी सरपंच, उपसरपंच, आणि सदस्य ग्रामस्थ व चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक व सभासद समस्त ग्रामस्थ लोणी व्यंकनाथ यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. तरी या कार्यक्रमांसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सतीश पांडुरंग जगताप मारुती तुकाराम शेलार यांनी केले आहे.
COMMENTS