Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूर येथे राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

इस्लामपूर / प्रतिनिधी : भारतीय व्हॉलीबॉल महासंघ व महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने सांगली जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीने 24 व्या 21 व

सज्जनगडावर लवकरच रोप-वे; 10 कोटींचा निधी मंजूर
राष्ट्रीय महामार्गावर धारधार शस्त्रासह एकास अटक
सातारा-म्हसवड-माळशिरस चौक रस्ता दुरुस्तीची मागणी

इस्लामपूर / प्रतिनिधी : भारतीय व्हॉलीबॉल महासंघ व महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने सांगली जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीने 24 व्या 21 वर्षाखालील युथ पुरुष व महिला राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे इस्लामपूर येथे आयोजन केले आहे. ही स्पर्धा पोलीस परेड मैदानावरील लोकनेते राजारामबापू पाटील क्रीडा नगरीत मंगळवार, दि. 10 ते रविवार, दि. 15 मे या कालावधीत होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेत संपूर्ण देशातील वेग-वेगळ्या राज्यांचे पुरुषांचे 30 संघ तर महिलांचे 27 संघ तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक, पंच व संघटनेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. यापूर्वी सांगली जिल्ह्याने सन 1983, 1987, 1995 व 2003 मध्ये खुल्या गटाच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा प्रथमच सांगली जिल्ह्यात आपल्या इस्लामपूर शहरात होत आहेत.
इस्लामपूर शहर व सांगली जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळास मोठी परंपराक इतिहास आहे. आपल्या जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नावलौकिक केला आहे. व्हॉलीबॉल खेळातून वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना विविध पदावर व नोकरी करण्याची संधी मिळाली आहे. आम्ही या राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने प्रतिसाद नावाची स्मरणिका प्रकाशित करत आहोत. पोलीस परेड मैदानावर सहा मैदाने उभारली जात आहेत. यातील चार मैदानावर दिवस रात्रीचे सामने खेळविण्यासाठी प्रकाश झोताची व्यवस्था करत आहोत. मैदानाच्या पश्‍चिम बाजूला व्यासपीठ उभारून दक्षिण, उत्तर व पूर्व बाजूला पाच हजार क्रीडाप्रेमींना बसण्यासाठी गॅलरीच्या व्यवस्था करत आहोत. प्राचार्य आर. डी. सावंत, शिव छत्रपती पुरस्कार विजेते पोपट पाटील, व्हॉलीबॉल संघटनेचे जिल्हा सचिव प्रा. डॉ. संदीप पाटील, राजे सातपुते, मोहन पाटील (भिलवडी), प्रकाश पाटील, मानसिंग पाटील, जमीर आत्तार, प्रकाश शेळके यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, खेळाडू यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

COMMENTS