पुणे ः चित्रपट हा मानवी जीवनांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकत असतो. चित्रपट बघूनच मुले खूप काही शिकत असतात. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणार्
पुणे ः चित्रपट हा मानवी जीवनांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकत असतो. चित्रपट बघूनच मुले खूप काही शिकत असतात. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणार्या मुलांनी देखील असे मराठी चित्रपट बघितले पाहिजेत माझे बहुतेक चित्रपट प्रौढांबरोबर लहान मुलांनी देखील जास्त बघितले ही आनंदाची बाब आहे. बालचित्रपट मोहोत्सव सर्वत्र आयोजित करणे आजमितीस काळाची गरज आहे. बाल चित्रपट म्हणजे त्यात लहान मुले असलीच पाहिजे अस नाही विषय व मांडणी महत्वाची असते असे प्रतिपादन अभिनेते महेश कोठारे यांनी केले. पुण्यात सिटी प्राईड कोथरूड येथे संपन्न झालेल्या बाल चित्रपट मोहोत्सवाची सांगता अभिनेते महेश कोठारे यांच्या हस्ते झाली त्यावेळी ते बोलत होते.
‘संवाद पुणे’ तर्फे आयोजित या बाल चित्रपट मोहोत्सवाच्या सांगता समारंभात जेष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या हस्ते अभिनेते महेश कोठारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी मंदार जोशी यांनी लिहिलेले ‘डॅम इट आणि बरंच काही’… या महेश कोठारे यांच्या आत्म चरित्रावर असलेल्या पुस्तकाचे ‘स्टोरीटेल’ ऑडियो पमध्ये प्रकाशन करण्यात आले. यावेळी रामदास फुटाणे म्हणाले, मुलांनी घरात मराठीतच बोलले पाहिजे, मुलांना पालकांनी मराठी बालनाट्ये, बाल चित्रपट दाखवले पाहिजेत. आपल्याला इंग्रजी चांगले आलेच पाहिजे पण मराठीचा बळी देऊन ते घरात येता कामा नये. पुढे ते म्हणाले आजोबा नाचू लागले आणि आजी नाचू लागली अन शेमाडी नातवंडे इंग्रजी वाचू लागली,नातू नाचू लागला नात नाचू लागली आणि रोजची इंग्रजीची रद्दी घरी साठू लागली, अजाण मुळाखाली माती नाचू लागली आणि इंग्रजीच्या डोहाला पोथी टोचू लागली या महोत्सवात दाखवल्या गेलेल्या सात चित्रपटांपैकी चार चित्रपट अजून रिलीज देखील झाले नाहीयेत त्यांचा प्रीमियर आता झालाय आणि त्या चित्रपटांचा मुलांनी आणि पालकांनी आनंद घेतला आहे तसेच या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेल्या चित्रपटांपैकी जिप्सी हा चित्रपट कांस मोहोत्सवासाठी जाणार असल्याची माहिती प्रोग्रॅम डायरेक्टर विशाल शिंदे यांनी दिली.पालकांचा आणि मुलांचा जो प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे त्यावरून पुढच्या वर्षी आम्हला दोन स्क्रीन घ्यावे लागतील आणि याचा आम्हाला आनंद होत आहे अशी भावना संवाद पुणे चे अध्यक्ष सुनिल महाजन यांनी व्यक्त केली.
COMMENTS