भातकुडगाव फाटा ः शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी सह परिसरातील गावातील मराठा समाजातील तरुणांनी अंतरवाली सराटी येथे होणार्या संघर्ष योद्धा मनोज जरांग

भातकुडगाव फाटा ः शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी सह परिसरातील गावातील मराठा समाजातील तरुणांनी अंतरवाली सराटी येथे होणार्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी 14 ऑक्टोबर रोजी होणार्या मराठ्यांच्या विराट महासभेला उपस्थित राहण्यासाठी मठाचीवाडी परिसरातील शहाली पिंपरी, रांजणी, दहिगावने, भाविनिमगाव, शहरटाकळी, ढोरसडे, आंत्रे, देवटाकळी, बक्तरपूर, भातकुडगाव फाटा, भायगाव, मजलेशहर या गावात मोटरसायकल रॅली काढून जनजागृती केली. यावेळी प्रत्येक गावात या रॅलीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. मठाचीवाडीमध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात केली.
यावेळी मठाचे वाडीची सरपंच सतीश धोंडे व विठ्ठल जगदाळे यांनी स्वागत केले. तर शहालीपिप्री मध्ये राजेंद्र नवथर, नितीन नवथर, बाळासाहेब नवथर, रांजणी मध्ये तात्यासाहेब घुले, अरुण थोरात, राजेंद्र घुले, दहिगावनेत राजाभाऊ पाऊलबुध्दे कडुबाळ माताडे भविनिमगावमध्ये छत्रपती शिव स्मारक समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.देवटाकळी येथे देवटाकळी ग्रामपंचायतच्या उपसरपंच उज्वलाताई मेरड यांनी औक्षण करून स्वागत केले.संदीप खरड यांनीही स्वागत केले. भातकुडगाव फाटा येथे कामधेनु पतसंस्था बक्तरपुर व व्यापारी मित्र परिवाराच्या वतीने बाळासाहेब काळे व भाऊराव फटांगरे यांच्यावतीने स्वागत करण्यात आले.भायगाव मध्ये विठ्ठल आढाव मित्र मंडळाच्या वतीने मंडळाच्या वतीने स्वागत केले केले. मजलेशहर येथे सरपंच अशोक वकीलराव लोंढे ज्ञानदेव लोंढे अशोक लोंढे यांनी स्वागत केले.रॅलीमध्ये रामजी शिदोरे , आत्माराम घुणे, संतोष वाघ, विकास थोरात, गणेश करंजे, महेश जगदाळे, महेश करंजे, विष्णू जगदाळे, विनोद ठोंबळ, विठ्ठल प्रल्हाद आढाव, प्रदिप नवथर, नानासाहेब नवथर, सोपानराव नवथर, दत्ताभाऊ नवथर, सौरभ नवथर, सार्थक कमानदार, आकाश नवथर, शरद थोटे, पत्रकार शहाराम आगळे यांच्यासह बहुसंख्य तरुणांनी सहभाग घेतला.
COMMENTS