Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्‍न सुटण्यासाठी गुरुवारी बैठकीचे आयोजन

शिक्षण उपसंचालकांसह शिक्षण विभागाचे अधिकारी राहणार हजर

Preview attachment Amdar Kishor Darade.jpeg अहमदनगर : जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नाशिक व

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंतीनिमित्त वंचितवतीने रक्तदान शिबिराचे कोल्हारी येथे आयोजन
 केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर
सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी ड्रेसकोड लागू

Preview attachment Amdar Kishor Darade.jpeg

अहमदनगर : जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.12 सप्टेंबर) शहरात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 1 वाजता बुरुडगाव रोड येथील रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय कार्यालयात शिक्षण उपसंचालक (पुणे) आणि माध्यमाध्यमिक, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी, वेतन अधिक्षक, लेखाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर तसेच क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रश्‍न सोडवणुकीसाठी योग्य त्या कागदपत्रासह बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार दराडे यांचे स्वीय सहाय्यक हरीश मुंडे व वैभव सांगळे यांनी केले आहे.
 नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर शहरात बैठक घेत आहे. यापूर्वी देखील शिक्षक दरबार घेऊन त्यांनी अनेक शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्‍न सोडविले होते. दुपारी 1 वाजता प्राथमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण विभाग यांच्यासोबत आणि दुपारी 2 वाजता माध्यमिक शिक्षण अधिकारी व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत प्रश्‍न घेऊन आलेल्या शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS