Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव शहरात श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन

कोपरगाव शहर ः हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्व असून या महिन्यात जगभरातील अनेक हिंदू बांधव आपपाल्या परीने देवाची पूजापाठ करत असतात

राहुरी तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांचा वाजला बिगुल
रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या व्यवस्थापनाची समता पतसंस्थेला भेट

कोपरगाव शहर ः हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्व असून या महिन्यात जगभरातील अनेक हिंदू बांधव आपपाल्या परीने देवाची पूजापाठ करत असतात. या काळात जगभरातील सर्व देव-देवतांची मंदिरे भाविकांनी अक्षरशः फुलून गेलेली असतात. याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरात देखील मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळाच्या वतीने  गेल्या 18 वर्षापासून श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते.
कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांच्या सौजन्याने सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, यंदा या सोहळ्याचे हे 19 वे वर्ष असून शहरातील सुवर्णकार भवन सराफ बाजार या ठिकाणी गुरुवार दि 22 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार्‍या या पारायण सोहळ्याची सांगता शुक्रवार दि 30 ऑगस्ट 2024 रोजी होणार असून. नऊ दिवस चालणार्‍या या पारायण सोहळ्याची सुरुवात जगद्गुरू जनार्धन स्वामी मौनगिरीजी महाराज समाधीस्थान बेट कोपरगाव येथील मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते मोठ्या भक्तिभावाने पूजा आरती करत होणार आहे. शुक्रवार 30 ऑगस्ट 2024 रोजी होणार्‍या समाप्तीच्या दिवशी  शहरातील श्री संत नरहरी विठ्ठल मंदिर सराफ बाजार येथे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्यात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच ज्या भाविकांना पारायणास बसायचे आहे त्यांनी दत्ता उदावंत 9595942493, कुणाल लोणारी 8793532628 व संजय मंडलिक 9890118271 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा. असे आवाहन या प्रसंगी श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS