राहाता ःराहाता शहरामध्ये गुढी पाडवा सणाच्या तसेच मराठी नव वर्षाच्या निमित्ताने शहरांमध्ये महिलांची मोटरसायकल रॅली चे आयोजन केले आहे. रॅलीमध्ये जा
राहाता ःराहाता शहरामध्ये गुढी पाडवा सणाच्या तसेच मराठी नव वर्षाच्या निमित्ताने शहरांमध्ये महिलांची मोटरसायकल रॅली चे आयोजन केले आहे. रॅलीमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन रेल्वेची शोभा वाढवावी असे आव्हान दुर्गा वाहिनीचे गीता परदेशी यांनी केले आहे. मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून धर्माचा प्रचार प्रसार विस्तार व्हावा आणि या जगामध्ये धर्माला कुठेतरी विसरत चालणार्या महिला यांना धर्माचं सणवार व्रत वैकल्य या सर्व गोष्टींचे आठवण व आपल्या मुलांना त्याची शिकवण कशी करून द्यायची हे या माध्यमातून महिलांना याची जाणीव व्हावी. यासाठी महिलांना प्रेरित करण्यासाठी महिलांसाठी मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीची सुरुवात राहाता बस स्टॉपपासून सुरु होणार असून त्यानंतर शनी मंदिर रोड,हुतात्मा चौक, नवनाथ मंदिरापासून कानडे हॉस्पिटल, ग्रामीण दवाखानापासून, पुन्हा गळवंतीमार्गाने चितळी रोड वरून पुन्हा वीरभद्र मंदिराच्या परिसरामध्ये समाप्ती होणार आहे. मोटरसायकल रॅली मध्ये विश्व हिंदू परिषद,बजरंग दल व दुर्गा वहिनी सर्व मिळून महिलांसाठी हा उपक्रम राबवत आहोत. दुर्गा वाहिनीच्या माध्यमातून उपक्रम राबवताना महिलांची एकजूट होणे गरजेचे झाले आहे.तसेच महिलांना आपल्या संस्कृतीची जाणीव, संस्कृतीचा वारसा पुढे चालवायचा आहे. त्यासाठी महिलांसाठी काहीतरी नवीन उपक्रम राबवणे गरजेचे आहे. कलियुगातील आत्मनिर्भर जिजाऊंचे दर्शन या समाजाला व्हावे आणि प्रत्येक स्त्री मधील जिजाऊ जागृत व्हावी प्रत्येक घरा घरामध्ये एक शिव छत्रपती घडावा म्हणून आपल्या पारंपारिक सणांचे जाणीव करून देण्यासाठी आम्ही या रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये सहभागी होणार्या महिलांचे 11 क्रमांक काढणार आसून त्यासाठी आम्ही महिलांना पारंपारिक वेशभूषेत येणे बंधनकारक राहील. आपली स्वतःचे मोटरसायकल,स्कुटी,टू व्हीलर,फोर व्हीलर कोणत्याही वाहनांमध्ये महिलांनी सहभाग घ्यावा. उत्कृष्ट पोशाख धारण करणार्या महिलांना पैठणी साडी बक्षीस म्हणून देणार आहे. या उपक्रमासाठी विशेष सहकार्य क्रिस्टल ब्युटी अकॅडमी अँड मेकअप स्टुडिओ राहाता यांच्यातर्फे सर्व महिलांसाठी गिफ्ट व्हाउचर देण्यात येणार असून, बालाजी साडी सेंटर, के बी एस ग्रँड यांचे ही सहकार्य लाभले आहेत. असे दुर्गा वाहिनीच्या तालुका संयोजिका साक्षी भागवत, सह संयोजिका गीता परदेशी, शहर संयोजिका पूनाम चेमटे, सह संयोजिका त्रिषा पटेल,शहर सह संयोजिका सुप्रिया धाडगे, आदी महिला सदस्यांनी आव्हान केले आहे.
COMMENTS