Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्यात आज बैलगाडा शर्यतीचे आयोजन

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : श्रीगोंदा शहरातील तरुण पदाधिकारी आणि बैलगाडा असोशिएशनच्या पुढाकाराने आज सोमवार 20 मे रोजी दुपारी 12:00 वाजता श्रीगोंदा-

कोपरगाव पोलिसांचा गोळीबार.. एक जखमी
माणुसकी आणि कार्यावर ठरते श्रीमंती – पारस महाराज मुथा
दूध उत्पादकांना प्रति लिटर 50 पैसे रिबेट व भेटवस्तू ; राहात्यातील पंचकृष्णा डेअरीने केली दिवाळी गोड

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : श्रीगोंदा शहरातील तरुण पदाधिकारी आणि बैलगाडा असोशिएशनच्या पुढाकाराने आज सोमवार 20 मे रोजी दुपारी 12:00 वाजता श्रीगोंदा-जामखेड रोडवरील औटीवाडी येथील मैदानावर बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
    याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनेक पारंपरिक खेळ आणि स्पर्धा लोप पावत चाललेले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे मैदानी खेळ संपुष्टात येऊन, शाररिक विकलांगता वाढत असताना, पुन्हा या जुन्या आणि मातीतल्या मैदानी खेळांची आवश्यकता निर्माण झाल्याचे मत बैलगाडा शर्यतीचे आयोजकांनी व्यक्त केले आहे. त्यालाच दुजोरा देत श्रीगोंदा शहरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून, जुन्या खेळांना चालना देण्याचा प्रयत्न केला असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. त्यासाठी सोमवारी औटी वाडी येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील ही पहिलीच स्पर्धा असून, यापुढे हि परंपरा अविरत चालू ठेवण्याचा आयोजकांचा मानस आहे. यासाठी अनेक अडचणींना तोंड देत हा उपक्रम राबवण्यात आला असुन, प्रेक्षकांनी आणि बैलगाडा प्रेमींनी या स्पर्धेत सहभाग भाग घेऊन शर्यतीचा आनंद घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.  या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटीच्यां अधीन राहून 20 मे रोजी दुपारी 12:00 वाजेपर्यंत नोंद होणार्‍या स्पर्धकांनाच स्पर्धेत सहभागी होता येईल. यासाठी एक हजार रुपये प्रवेश फी आकारली जाणार आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम 51 हजार रूपये, द्वितीय 31 हजार रूपये, तृतीय 21 हजार रूपये/- पासून पाच हजार रूपयांपर्यंतची बक्षीस दिले जाणार आहेत. निर्णय देण्यासाठी नामांकित आणि अनुभवी पंच बोलवण्यात आले असुन, प्रशासकीय मान्यतेने स्पर्धा संपन्न होणार आहे. यावेळी संभाव्य दुर्घटनेची जबाबदारी बैलगाडा मालकाची राहणार असून, काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांसह आपत्कालीन वैद्यकीय परस्थितीसाठी दोन खाजगी रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या असून, पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. सदरील बैलगाडा शर्यत-स्पर्धा रोमहर्षक होणार असल्याने पंचक्रोशीसह तालुका-जिल्ह्यातील नागरिकांनी, बैलगाडा प्रेमींनी या मैदानाचा आनंद घ्यावा असे त्यांनी नमुद केले आहे. तालुक्यातील सामाजिक, राजकिय आणि विवीध क्षेत्रातील नामांकित मान्यवर या बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी येणार असल्याचे आयोजक आणि असोशिएशनचे राहुल वडवकर, रोहीत गोंधळी, भाऊसाहेब औटी, महेश पोकळे, दिपक पिंपळे, गणेश पिंपळे, सागर लबडे, गणेश वडवकर, नितिन शेंडगे सह पदाधिकार्‍यांनी सांगितले.

COMMENTS