Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिल्लीया महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

बीड प्रतिनिधी - मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजन करण्यात आलेल्या पुस्तक

देशात 21 ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास मंजुरी
बलवान युवा पिढी हीच खरी देशाची संपत्ती : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले
शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वपूर्ण साधन ः भावना खैरनार

बीड प्रतिनिधी – मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजन करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी सांगितले की भारतीय ग्रंथालयशास्त्राचे प्रणेते  डॉ. शियाळी रामामृत रंगनाथन हे एक भारतीय गणितज्ञ व पुस्तकालयतज्ञ होत.भारतीयांमध्ये वाचनसंस्कृती अधिकाधिक रुजावी यासाठी डॉ. रंगनाथन यांनी ग्रंथालयशास्त्र आणि त्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथपाल डॉ. अमीर सलीम यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की डॉ.एस.आर. रंगनाथन हे एक दानशुर व्यक्तीमत्व होते. त्यांची बुध्दी जेवढी विशाल होती तेवढेच त्यांचे हृदयही विशाल होते .1961 मध्ये शारदा रंगनाथन इण्डोमेंट ट्रस्ट, बेंगलोर यांना आपली मोठ्यात मोठी धनराशी समर्पित करुन दार्तृत्वाचे उदाहरण घालून दिले.या त्यांच्या आर्थिक योगदानामुळेच ग्रंथालयशास्रातील उच्च प्रतिचे प्रशिक्षण आणि प्रकाशनाला उत्तेजन मिळाले. डॉ. रंगनाथन यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (णॠउ) ग्रंथालय समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना विद्यापीठ व महाविदयालयीन ग्रंथालयांची वाढ व विकास कार्यात महत्वपूर्ण योगदान दिले. परदेशात तसेच स्वदेशातही विविध पदवी देवुन त्यांना सन्मानित करण्यात आले. पीटसबर्ग विद्यापीठ (अमेरिका )व दिल्ली विद्यापीठाने डी.लीट. पदवी तसेच  भारत सरकारने 1957 मध्ये पद्मश्री बहाल केली. यावेळी उपप्राचार्य डॉ.हुसैनी एस.एस., ग्रंथालय सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रोफेसर शेख कलीम मोहीयोद्दीन,डॉ. शेख गफूर, डॉ. शेख अब्दुल रहीम, प्रोफेसर सीमा हाश्मी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. शेख एजाज परवीन, डॉ.शामल जाधव, डॉ. सय्यदा तनवीर, प्राध्यापिका फर्रा फातेमा नहरी, नॅक समन्वयक डॉ.अब्दुल अनिस, सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.

COMMENTS