Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरलीधर मठ येथे अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन

बीड प्रतिनिधी - संस्थान रामानंद स्वामी मुरलीधर मठ, रविवार पेठ तेल गल्ली येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले

तरडगाव येथे आज धावणार बैलगाड्या
उजनीच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांचा रास्तारोको
नगरच्या श्रीविशाल गणपतीला चांदीची रत्नजडित अंगठी

बीड प्रतिनिधी – संस्थान रामानंद स्वामी मुरलीधर मठ, रविवार पेठ तेल गल्ली येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून  बीड शहरातील सुप्रसिद्ध भागवताचार्य सचिनजी महाराज सपकाळ यांच्या मधुर व रसाळ वाणीतून भागवत कथा श्रवणाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा कथेची सुरुवात  दि.17 मार्च वार शुक्रवार रोजी होणार असून सांगता दि.23 मार्च वार गुरुवार रोजी होणार आहे.भागवत कथा दररोज दु.1 ते 4 या वेळेत होणार आहे. या भागवत कथेस मातोश्री कुसुमताई सपकाळ, ह.भ.प. पवन महाराज सपकाळ ,ह.भ.प.आसाराम महाराज काठवडे, ह.भ.प.अंकुश महाराज मोरे यांची संगीत साथ लाभणार आहे.
अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ह.भ.प. डोंगरे महाराज ऋषीगड, ह.भ.प. विक्रम महाराज सारूक, ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडी,  ह.भ.प.अनंत महाराज शास्त्री मुळे आळंदी,ह.भ.प. नामदेव महाराज शेकटेकर,ह.भ.प. एकनाथ महाराज पुजारी बीड, ह.भ.प. रावसाहेब महाराज गोसावी यांचे रात्री 8 ते 10 वाजता सुश्राव्य किर्तन होणार आहे तर ह.भ.प. हंसराज महाराज मिसाळ माऊली संस्थान लिमगाव  यांचे काल्याचे किर्तन दि. 24 मार्च वार शुक्रवार रोजी 11 ते 1 वाजता होणार असून नंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.महाप्रसाचे अन्नदाते प्रकाश पवार, मुकेश शिवगण, संतोष कदम हे आहेत. तर या अखंड हरिनाम सप्ताहाचे व्यवस्थापक रावसाहेब गुजर संत, किशोर पवार आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम सप्ताह व संगीत भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्यावा अशी विनंती ह.भ.प. श्रीराम महाराज जाधव  संस्थान रामानंद स्वामी मुरलीधर मठ मठाधिपती यांनी केली आहे.

COMMENTS