Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गेवराईत ‘मूकनायक व दर्पण दिना’ निमित्त जिल्हास्तरीय पुरस्कारांचे आयोजन

गेवराई । प्रतिनिधीगेवराई येथे या वर्षी प्रती वर्षाप्रमाणे ‘मूकनायक व दर्पण दिना’ निमित्त विविध जिल्हास्तरीय पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. या

आम्ला गावात 14 वर्षीय मुलीचा बालविवाह उधळला
तलवाडा गाव तलाव संरक्षण प्रकरण: तिसरी नोटीस देण्यात विलंब, आंदोलनकर्‍यांचा रोष
रंगनाथ महाराज संस्थान, मादळमोही येथे धर्मनाथ बीज उत्सव उत्साहात साजरा

गेवराई । प्रतिनिधी
गेवराई येथे या वर्षी प्रती वर्षाप्रमाणे ‘मूकनायक व दर्पण दिना’ निमित्त विविध जिल्हास्तरीय पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात इच्छुकांनी आपले प्रस्ताव 20 जानेवारी 2026 पर्यंत पाठवावे, असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार संघ, जिल्हा अध्यक्ष बीड व दैनिक संघर्षयोद्धा मुख्य संपादक हुंबरे बापुसाहेब यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या पुरस्कारांचे उद्दिष्ट शेती, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रशासनिक, राजकीय, सहकार, उद्योग, नाट्य, पत्रकारिता, साहित्य, वैद्यकीय, महिला, युवा व लोकप्रतिनिधी क्षेत्रातील निस्वार्थ व सेवाभावी कार्य करणार्‍या व्यक्तींना सन्मानित करणे आहे. यामध्ये निवडक व्यक्तींना जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सहकुटुंबासह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. हे पुरस्कार सर्वसमावेशक व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेण्यासाठी आयोजित केले जातात. कार्यक्रमाची अचूक तारीख लवकरच निश्चित केली जाणार असून, त्याची माहिती प्रभागीय व स्थानिक माध्यमांद्वारे प्रसारित केली जाईल. इच्छुकांनी आपले प्रस्ताव खालील पत्यावर पाठवावे: पत्ता: दैनिक संघर्षयोद्धा, मुख्य कार्यालय, सावतानगर, तहसिल रोड, गेवराई संपर्क क्रमांक: 9657102708 / 7066103275 प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ: दुपारी 2 ते रात्री 9 वाजता हुंबरे बापुसाहेब, महाराष्ट्र पत्रकार संघ, बीड जिल्हा अध्यक्ष व दैनिक संघर्षयोद्धा मुख्य संपादक यांनी सर्व नागरिकांना, समाजसेवी व पत्रकार वर्गाला या पुरस्कारांसाठी आपले प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS