Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा साळेगाव येथे मौखिक आरोग्य तपासणी

केज प्रतिनिधी - राष्ट्रीय मौखिक आरोग्य अभियान व पीट अँड फिशर सिलंट पायलट प्रोजेक्ट अंतर्गत दिनांक 18 ऑगस्ट शुक्रवार रोजी जिल्हा परीषद केंद्रीय प

मिरवणूकीच्या खर्चाला फाटा देऊन सामाजिक उपक्रमाने महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
पिंपळनेर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गुणवंतांचा सम्मान
पोपटराव आवटे यांना महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

केज प्रतिनिधी – राष्ट्रीय मौखिक आरोग्य अभियान व पीट अँड फिशर सिलंट पायलट प्रोजेक्ट अंतर्गत दिनांक 18 ऑगस्ट शुक्रवार रोजी जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळा साळेगाव येथे जाऊन उपस्थित 150 पेक्षा जास्त विद्यार्थी, विद्यार्थिनींची दंत व मुख तपासणी करून त्यांना मौखिक आरोग्याची घ्यावयाची काळजी जसे की नियमित दोन वेळा ब्रश करणे,गोड,चिकट, चॉकलेट,जंक फूड इत्यादी पदार्थांपासून दूर राहणे आणी ब्रश करण्याची योग्य पद्धत इत्यादी बाबी बद्दल सविस्तर मार्गदर्शन केज शहरातील सर्वात जुने आणी उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ दंतशल्य चिकित्सक डॉ. रमण दळवी यांनी केले.
तसेच गरजु विद्यार्थ्यांची पिट फिसर ट्रीटमेंट ही शाळेतच केली.शिबिरा करिता उपजिल्हा रुग्णालय केज येथील समुपदेशक सीता गिरी उपस्थीत होत्या त्यांनी दैनंदीन आहार आणी आरोग्य यावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपजिल्हा रुग्णालय केज चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोळंके सर यांचे मोलाचे मार्गदर्शन होते.तर शाळेच्या मुख्याध्यापक आणी शिक्षक यांनी यशस्वी आयोजनासाठी मदत केली तसेच योग्य स्वागत सत्कार देखील केला.डॉ.रमण दळवी आणी त्यांची टीम वेगवेगळ्या शाळेत जाऊन घेत असलेल्या मौखिक दंत आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

COMMENTS