कोमलताई पाटोळे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात ग्रामीण कलाकारांना संधी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोमलताई पाटोळे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात ग्रामीण कलाकारांना संधी

दिव्यांग कलाकार दिलीप कोल्हेच्या आवाजाने प्रेक्षक मंत्रमुग्ध

  अहमदनगर प्रतिनिधी - शेवगाव- नेवासा रोड वरील भातकुडगाव फाटा येथील श्रीकृष्ण ट्रेडर्स अँड हार्डवेअर व कापूस खरेदी विक्री या दालनाचा शुभारंभ श्रीक्

नगरमधील कोविड रुग्णसंख्या लागली घटू ; रोजचा सातशेचा आकडा आला अडीचशेवर, लॉकडाऊनचा परिणाम
लोकनेते बाळासाहेब थोरात गौरव पुरस्काराने 25 गुणवंत शिक्षकांचा सन्मान
शासकीय उपक्रमात लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावे

  अहमदनगर प्रतिनिधी – शेवगाव- नेवासा रोड वरील भातकुडगाव फाटा येथील श्रीकृष्ण ट्रेडर्स अँड हार्डवेअर व कापूस खरेदी विक्री या दालनाचा शुभारंभ श्रीक्षेत्र हनुमान टाकळी देवस्थानचे महंत रमेश आप्पा महाराज(Ramesh Appa Maharaj) यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर दुपारच्या सत्रात महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका कोमलताई पाटोळे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.
 या कार्यक्रमात भातकुडगाव फाटा परिसरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ढोरजळगाव येथील दिलीप कोल्हे या दिव्यांग कलाकाराला मंचावर बोलून आपली कला सादर करण्यासाठी संधी दिली गेली. त्यावेळी अपंगत्वावर मात करीत संत एकनाथ यांची संतवाणी आपल्या पहाडी आवाजात गाऊन उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. त्यानंतर विविध गाण्यावर डान्स करून अपंगत्ववर खचून न जाता फक्त एकाच पायावर उभा राहून डान्स करून उपस्थितांना एक प्रेरणाच दिली. कार्यक्रमाची संधी मिळाल्याने कोमलताई पाटोळे यांच्या सह सर्वच कलाकारांचे दिलीप कोल्हे यांनी आभार मानले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शेवगाव -पाथर्डी जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अँड. शिवाजीराव काकडे, गुरुनाथ माळवदे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष वाय. डी. कोल्हे, भातकुडगाव फाटा येथील प्रसिद्ध व्यापारी गोरक्षनाथ बडे, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, भारुड सम्राट हमीद सय्यद, ज्येष्ठ पत्रकार आर. आर.माने, बाळासाहेब जाधव, आर आर घुमरे, विठोबा वाघमोडे, रामदास बडे, राजेश लोंढे, संदीप काळे,यांच्यासह परिसरातील नागरिकसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS