Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्रिमंडळात नव्या चेहर्‍यांना संधी ; भाजपच्या 20 शिवसेनेच्या 10 राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी घेतली शपथ

नागपूर : महायुती सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार उपराजधानी नागपुरात रविवारी पार पडला. सोहळ्याची सुरूवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने सु

नाशिकचे माजी आमदार बबनराव घोलप शिंदे गटाच्या वाटेवर 
Yamaha RX100 चाहत्यांसाठी खुशखबर
निम्मा भारत झाला लसवंत ; 127 कोटींहून अधिक लोकांना लस

नागपूर : महायुती सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार उपराजधानी नागपुरात रविवारी पार पडला. सोहळ्याची सुरूवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने सुरूवात करण्यात आली. त्यानंतर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 39 मंत्र्यांना शपथ दिली. भाजपच्या 17 आमदारांनी कॅबिनेटची तर 3 मंत्र्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे शिवसेनेच्या 8 मंत्र्यांनी कॅबिनेटची तर 2 मंत्र्यांनी राज्यपदाची शपथ घेतली. यासोबतच राष्ट्रवादी काँगे्रसमधील 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतजली. या मंत्रिमंडळात सर्वाधिक नव्या चेहर्‍यांना प्रथमच संधी देण्यात आली.
भाजपच्या वतीने सर्वप्रथम चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॅबिनेटची मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, प्रा. अशोक उईके, अ‍ॅड. आशिष शेलार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे, आकाश फुंडकर, प्रकाश आबीटकर, यांनी कॅबिनेटची तर राज्यमंत्रीपदाची माधुरी मिसाळ, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर यांनी शपथ घेतली. तर शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभुराज देसाई, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, बाबासाहेब पाटील यांनी कॅबिनेटची शपथ घेतली. तर राज्यमंत्रीपदाची आशिष जैस्वाल, यांनी तर राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, मकरंद जाधव पाटील, इंद्रनील नाईक या मंत्र्यांनी शपथ घेतली.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांना डावलल्यामुळे नाराजी उफाळून येतांना दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार भंडारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रिपद मिळाले नसल्याने नाराज होत भोंडेकर यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी उपनेते पदाचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे.

मंत्र्यांचा कार्यकाळ असेल अडीच वर्षांचा
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी झाला असला तरी, या मंत्र्यांचा कालावधी केवळ अडीच वर्षांचा असणार आहे. ज्या विद्यमान मंत्र्यांना शपथ दिली, त्यांच्याकडून अडीच वर्षांची शपथपत्रे लिहून घेतले आहे, त्यानंतरच त्यांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा नागपुरात मेळावा पार पडला. या मेळाव्या अजित पवार यांनी मंत्रिपदाबाबत मोठे वक्तव्य केले. आज शपथ घेणारे मंत्री यांचा कार्यकाळ ही अडीच वर्षांचा असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले. नागपूर येथील देशपांडे सभागृहात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.


भुजबळ, वळसे पाटील, मुनगंटीवार या ज्येष्ठ नेत्यांना डावलले

या मंत्रिमंडळात सर्वाधिक नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. त्यासोबतच अनेक ज्येष्ठ नेत्यांची संधी डावलण्यात आली आहे. भाजपने ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना डावलले आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँगे्रसने देखील दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देणे नाकारले आहे. तर दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेने देखील माजी मंत्री अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांना संधी देणे नाकारले आहे.

भाजपच्या या नेत्यांना मंत्रिपदाची संधी
1-चंद्रशेखर बावनकुळे
2-राधाकृष्ण विखे पाटील
3-चंद्रकांत पाटील
4- गिरीश महाजन
5- गणेश नाईक
6-मंगलप्रभात लोढा
7-जयकुमार रावल
8-पंकजा मुंडे
9- अतुल सावे
10-प्रा. अशोक उईके
11- अ‍ॅड. आशिष शेलार
12-शिवेंद्रसिंहराजे भोसले
13- जयकुमार गोरे
14- संजय सावकारे
15-नितेश राणे
16- आकाश फुंडकर
17- प्रकाश आबीटकर
18- माधुरी मिसाळ राज्यमंत्री,
19- पंकज भोयर
20-मेघना बोर्डीकर

शिवसेनेकडून या नेत्यांना संधी
1-गुलाबराव पाटील
2-दादा भुसे
3-संजय राठोड
4- उदय सामंत
5-शंभुराज देसाई
6- संजय शिरसाट
7- प्रताप सरनाईक
8- भरत गोगावले
9- आशिष जैस्वाल, राज्यमंत्री
10-योगेश कदम

राष्ट्रवादीकडील नवीन नेत्यांची नावे
1-हसन मुश्रीफ
2-धनंजय मुंडे
3-दत्तात्रण भरणे
4- अदिती तटकरे
5- माणिकराव कोकाटे
6- नरहरी झिरवाळ
7-मकरंद जाधव पाटील
8-बाबासाहेब पाटील
9- इंद्रनील नाईक

COMMENTS