विरोधक खोटे आरोप करत असून आम्ही कुठल्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार;- भाजपाचे विरोधकांना आवाहन …

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विरोधक खोटे आरोप करत असून आम्ही कुठल्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार;- भाजपाचे विरोधकांना आवाहन …

अभिजित खंडागळे/पाथर्डी : पालिकेच्या मालकीचे भूखंड आम्ही विकले नसून त्याचा विकास केला आहे.तुमच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी भूखंड लुबाडले आहेत.क

कर्जतमध्ये साकारणार श्री संत सदगुरू गोदड महाराजांचे भव्य भक्तनिवास
Ahmednagar : भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर नगर शहरात रास्तारोको (Video)
श्रीगोंद्यात शिवसेनेची महिला शाखा कार्यकारिणी जाहीर

अभिजित खंडागळे/पाथर्डी : पालिकेच्या मालकीचे भूखंड आम्ही विकले नसून त्याचा विकास केला आहे.तुमच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी भूखंड लुबाडले आहेत.काम करायला,सांगायला काही राहिले नाही.त्यामूळे पाच वर्षं झोपलेले विरोधक उठसुठ पालिकेत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत आहेत.आता आमची सत्ता नसुन कोणावर दबाव नाही.निःपक्षपाती चौकशी झाल्यानंतर जनतेसमोर सत्य येईल तेव्हा जनता पण यांना यांची जागा दाखवून देत आम्हाला पुर्ण बहुमताने निवडुन देईल असे प्रतिपादन शासकीय विश्रामगृह येथे भाजप पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती.त्यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ.मृत्यूजय गर्जे यांनी केले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर,जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड, महीला आघाडीच्या तालुकाध्यक्षा गोल्हार,उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके,माजी उपनगराध्यक्ष बंडु बोरुडे, बजरंग घोडके,अनिल बोरुडे,महेश बोरुडे भगवान साठे,सुनिल ओव्हळ, नामदेव लबडे,रमेश हंडाळ, बबन बुचकुल आदी जण उपस्थित होते. पुढे बोलताना गर्जे यांनी म्हटले की,१२० कोटींच्या कामात भ्रष्टाचार झाला असे आरोप विरोधक करत आहेत.म्हणजे त्यांनी १२० कोटीचे कामे झाल्याचे मान्य केले आहे.पालिका सभागृहात त्यांचेही नगरसेवक होते.सर्व कामे सभेमध्ये ठराव घेऊन केली आहेत.कामांना मान्यता देणारे माणसे शासकीय कर्मचारी आहेत.तरीही तुम्ही भ्रष्टाचार झाला असे म्हणता हे खेदजनक आहे.शनिवारी राष्ट्रवादी पक्षामार्फत पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी बंडू बोरुडे यांनी आमदार व नगराध्यक्ष हे दुसऱ्या ठेकेदाराला निविदा भरून नये म्हणून धमकावत असल्याचे म्हटले शहरात आमची दहशत नसून बंडू बोरुडे व त्यांचे सहकारी शहरातील एखाद्या मोकळ्या जागेवर उभे राहिले तर त्याचा मालक त्याठिकाणी कुंपण घालतो मग दहशत कोणाची असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.

   शहरातील नागरिकांची स्वच्छतागृहाची मागणी पूर्तता करण्यासाठी पाउल उचले असता इथेच का केले,तिथेच का केले असे प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत.पण त्यासाठी शासकीय मालकीची जागा लागते.ती उपलब्ध आहे का?पालिकेच्या मोकळ्या जागेबाबत अपिल चालू असून त्याचे सत्य हे थोड्याच दिवसांत जनतेसमोर येणार आहे.तसेच आम्ही पालिकेत आलो तेव्हा जे.सी.बी.बंद होता.तो चालू करण्यासाठी तांत्रिक अडचणी  येत होत्या.त्यासाठी पत्रव्यवहार करावा लागतो त्याला वेळ लागतो.त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होणारच आहे.सध्या ब्लॅकमेलिंगच्या टोळ्या तयार झाल्या आहेत.

आज जे आरोप करत आहेत त्याचे नेते व त्यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांच्या ताब्यात ग्रामपंचायत नाही.जिल्हापरिषदेमध्ये दोन हजार मतांनी निवडून आले.त्यानंतर झालेल्या आमदारकीत ७ ते ८ हजार मतांनी पडला हे चांगल्या कामाचे लक्षण आहे का?लोकांचा तुमच्यावरील विश्वास का कमी झाला याचाही विचार करा.यापुढे खोटे आरोप केले तर त्याचे उत्तर देऊ.आम्ही सर्व पदाधिकारी कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत.असे मत व्यक्त केले.

  तर गोकुळ दौड यांनी म्हटले की,सध्या पाथर्डी तालुक्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत.साडेचारवर्षापासून झोपलेले विरोधक दोन तीन महिन्यांपासून निवडणुका आल्या म्हणुन गल्लीबोळात वळवळ करत आहेत.ज्यानी साडेचार वर्षात जिल्हापरिषदेच्या माध्यामातून एक विकासाच  नारळ फोडलं नाही.त्यांना हिशोब विचारण्याचा अधिकार नाही.कोरोनाच्या परिस्थितीत हे कुठे होते.प्रशासकीय कामाची मान्यता नसलेल्या कामाचे कार्यक्रम हे करत आहेत.यांच्या हातात एकही संस्था नाही.जी एक संस्था त्यांच्या ताब्यात आहे.तिथे बैल बांधायालाही जागा ठेवली नाही.भूखंड विकून टाकले त्याबाबत न्यायालयात आम्ही दावा दाखल करणार आहोत.

पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपाची सुरवात झाली आहे.

COMMENTS